शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीसाठी-बाळासाहेब थोरात; खासदारही देणार पंतप्रधान सहाय्यता निधीला वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 13:15 IST

काँग्रेसने संकटकाळात नेहमीच पुढे राहिली आहे. सरकारला आर्थिक मदत करण्यासाठी काँग्रेस पक्षाने विधानसभा व विधान परिषदेतील आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तसेच लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांचे एक महिन्याचे वेतन पंतप्रधान मदत निधीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

संगमनेर : कोरोनाचे संकट गंभीर असून त्याचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक ती मदत करणे गरजेचे आहे. काँग्रेसने संकटकाळात नेहमीच पुढे राहिली आहे. सरकारला आर्थिक मदत करण्यासाठी काँग्रेस पक्षाने विधानसभा व विधान परिषदेतील आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तसेच लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांचे एक महिन्याचे वेतन पंतप्रधान मदत निधीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.       कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. सरकारी पातळीवरून सर्व प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीचे सरकार योग्य नियोजन करीत आहे. अनेक सामाजिक संस्था, उद्योगपती, तसेच व्यक्तीगत पातळीवरूनही सरकारला आर्थिक मदत करण्यासाठी हजारो हात पुढे आले आहेत. काँग्रेस पक्षाने  सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशहिताला व नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. कोरोनाच्या संकट काळात सर्व आमदार व खासदारांनी एक महिन्याचे वेतन मदत निधीसाठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. पोलीस यंत्रणा, आरोग्य तसेच विविध शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी दूत म्हणून अहोरात्र काम करीत आहेत. जनसेवेच्या मदतीसाठी हे उल्लेखनीय ठरत आहे. त्या सर्वांचे कौतुक करावे वाटते.  काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत जमा करण्याची इच्छा आहे. त्यांनी, महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ या स्वतंत्र बँक खात्यात आपली मदत जमा करावी, असे आवाहन मंत्री थोरात यांनी केले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरcongressकाँग्रेसBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात