श्रीरामपूर : स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी बजरंग दरंदले यांची, तर शहराध्यक्षपदी गोपीनाथ शिंदे यांची फेरनिवड करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई यांनी दिली. येथे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी ठाकूर छतवानी होते. रज्जाक पठाण, चंद्रकांत झुरंगे, शिवाजी वायदंडे, प्रकाश गादिया, दिलीप गायके, अरुण खंडागळे, सुभाष चोरडिया, अनिल मानधना, नरेंद्र खरात, मंगेश छतवानी, गोपाल लिंगायत आदी उपस्थित होते. मंडलनिहाय प्रमुख म्हणून विजय मैराळ, दिलीप गायके, योगेश नागले, गोपाल लिंगायत यांची, तर तालुका समन्वयक म्हणून योगेश गंगवाल यांची निवड जाहीर करण्यात आली.
बजरंग दरंदले यांची
By | Updated: December 5, 2020 04:39 IST