शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

हुंड्यासाठी पळविले आजोबांनी बाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 03:48 IST

मुलीच्या सासरच्या मंडळींनी लग्नात ठरलेला हुंडा न दिल्याने नात पळविल्याचा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात उघड झाला आहे.

जामखेड (जि. अहमदनगर) : मुलीच्या सासरच्या मंडळींनी लग्नात ठरलेला हुंडा न दिल्याने नात पळविल्याचा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात उघड झाला आहे. मुलगी ऊस तोडणीला गेल्यानंतर आजोबांनी तिचे पाच दिवसांचे बाळ पळविले होते.विशेष म्हणजे बाळाच्या आईने आपल्या वडिलांविरोधात जामखेड न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी कारवाई केली, अशी माहिती लोकाधिकार आंदोलनाचे जामखेड तालुका उपाध्यक्ष बाजीराव गंगावणे यांनी दिली.जामखेड पोलिसांनी जेऊर येथे जाऊन पंडराव पाहुण्या काळे यांच्याकडून बाळ ताब्यात घेतले व पुन्हा आईच्या कुशीत स्वाधीन केले. मुलीला पाहताच आई गहिवरली. आदिवासी समाजात वर पक्षाकडून वधूच्या वडिलांना हुंडा देण्याची पद्धत आहे. कीर्ती पवार ही पती अशोक याच्यासोबत ऊस तोडणीसाठी जेऊरला गेली होती. तेथे तिची प्रसुती झाली. हुंड्याचे पाच हजार रुपये दिले नाही म्हणून कीर्तीचे वडील पंडराव यांनी बाळाला पळविले होते. बाळाबाबत तक्रार नसल्याने कोणतीही कारवाई केली नाही, असे पोलिसांनी सांगितले.