अकोले : पुलाचीवाडी ते इंदोरी फाटा दरम्यान मंगळवारी रात्री ११.५५ वाजता एका महिलेने १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतच मुलीला जन्म दिला आहे. बाळ ब बाळंतीन सुखरूप आहे.अकोले तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील पुरुषवाडी येथील उषा युवराज सोनवणे (वय २६) या महिलेस बाळंतपणासाठी अकोले ग्रामीण रुग्णालयात १०८ क्रमांकाच्या रुगवाहिकेतून रात्री आणले जात होते. इंदोरी फाट्याजवळ रुग्णवाहिका आल्यावर या महिलेच्या पोटात अधिक दुखू लागले. गाडी चालक दत्ता देशमुख यांनी प्रसंगावधान राखत गाडी सावधपणे चालविली.गाडीत असलेले डॉ.अनिल चव्हाण यांनी चालू गाडीतच उपचार करीत महिलेची बाळांतपणातून सुखरूप सुटका केली. बाळ ब बाळंतीन सुखरूप आहे.
१०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेतच जन्मले बाळ; बाळ, बाळंतीन सुखरुप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 13:15 IST