शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नगरचे महापौर बाबासाहेब वाकळे स्वत:च्या प्रभागातच क्वारंटाईन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 12:14 IST

अहमदनगर शहरात कोरोनाचे संकट गडद होत असताना महापौर बाबासाहेब वाकळे मात्र स्वत:च्या प्रभागातच क्वारंटाईन झाले आहेत. शहरातील नागरिकांच्या समस्या काय आहेत, कोरोनाचा प्रतिबंध करण्याबाबत उपाययोजना व्यवस्थित राबविण्यात येतात की नाही हे पाहण्याऐवजी वाकळे आपल्या प्रभागातच गुंतले आहेत.

अहमदनगर :  शहरात कोरोनाचे संकट गडद होत असताना महापौर बाबासाहेब वाकळे मात्र स्वत:च्या प्रभागातच क्वारंटाईन झाले आहेत. शहरातील नागरिकांच्या समस्या काय आहेत, कोरोनाचा प्रतिबंध करण्याबाबत उपाययोजना व्यवस्थित राबविण्यात येतात की नाही हे पाहण्याऐवजी वाकळे आपल्या प्रभागातच गुंतले आहेत.नगर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना महापौर बाबासाहेब वाकळे  मात्र भागातून बाहेर पडायला तयार नाहीत. प्रभाग क्रमांक सहा मध्ये स्थापन केलेल्या सुरक्षा समितीचा आढावा घेऊन त्यांनी सूचना केल्या. त्यामुळे वाकळे हे प्रभागाचे महापौर आहेत की शहराचे ? असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.शहरावरील कोरोनाचे  संकट गडद झाले आहे. एकापाठोपाठ एक रुग्ण सापडत आहेत. महापालिकेकडून उपाययोजनाही सुरू आहेत. महापालिका प्रशासनाने नगरसेवक यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग सुरक्षा समिती स्थापन केली. महापौर बाबासाहेब वाकळे हे प्रभाग क्रमांक सहाचे नेतृत्व करतात. त्यांनी गुरुवारी त्यांच्या प्रभागातील सुरक्षा समितीची बैठक घेतली. ही बैठक त्यांनी सोशल डिस्टन्स पाळून घेतली. इतर प्रभागांतील समित्यांचे काय सुरू आहे ? याचा मात्र महापौरांना अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. वाकळे हे आपल्याच  प्रभागातील कामे मार्गी लावण्यात व्यस्त असतात, अशी त्यांच्यावर नेहमीच टीका केली जाते. इतर प्रभागात मात्र ते फारसे लक्ष देत नाहीत. त्यात कोरोनाच्या संकट काळातही ते आपल्याच प्रभागात तळ ठोकून आहेत. म्हणूनच वाकळे हे   शहराचे महापौर आहेत की त्यांच्या प्रभागाचे असा प्रश्न निर्माण होतो.सिद्धीबागेसमोरील गटारीचा प्रश्न, वादळी पावसात शहरात अनेक ठिकाणी झालेले नुकसान, बाहेरून शहरात लोक येत आहेत, त्यामुळे त्यांच्यापासून शहरातील लोकांना भिती निर्माण झाली आहे. प्रभागातील लोकांना त्यांनी अन्नधान्य वाटप केले? पण शहरातील नागरिकांना काही अडचणी तर नाहीत ना? याकडे पहायला मात्र महापौरांना वेळ मिळेनासा झाला आहे. महापालिकेला कल्पक व कृतीशील आयुक्त लाभले आहेत. मात्र त्यांच्यासोबत बसून शहरातील सर्व ठाकठीक करण्यासाठीही त्यांना वेळ मिळेना असे दिसते आहे. शहरात भाजीपाला विक्रीला अद्यापही शिस्त आलेली नाही.  याबाबत चौकोन आखायलाही महापालिकेला वेळ मिळाला नाही की महापौरांना लक्ष घालायला वेळ मिळाला नाही.  चितळे रोड, डाळ मंडईत रोजच फिजिकल डिस्टन्सिगचा फज्जा उडतो. मात्र तिथे महापालिकेचे कोणतेही पथक अत्तापर्यंत गेलेले दिसून आले नाही.   अशा कितीतरी समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. मात्र त्याला उत्तर कोण देणार? हाच खरा प्रश्न आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर