शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

म्हसे गावात चिखलाच्या रंगात रंगली ‘बबन’ची टीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 19:13 IST

आतापर्यंत आपण नैसर्गिक रंग लावून खेळल्या गेलेल्या इकोफ्रेण्डली रंगपंचमीच्या बातम्या वाचल्या असतील. पण चक्क चिखलात माखून रंगपंचमी खेळण्याची ही ‘बबन’च्या टीमने सुरु केलेली प्रथा अनोखीच.

अहमदनगर : धुळवड म्हणजे रंगाचा खेळ. एकमेकांवर रंगांची मुक्त उधळण करुन साजरा केला जाणारा हा संण ‘बबन’ सिनेमातील टिमने एका आगळ्या-वेगळ्या ढंगात साजरा केला. श्रीगोंदा तालुक्यातील म्हसे गावात चिखलाच्या रंगात रंगण्याचा रंगाची अनोखी ‘धुळवड’ ‘बबन’ च्या टीमने साजरी केली. विशेष म्हणजे यात अनेक प्रेमीयुगालांनी सहभाग घेतला.आतापर्यंत आपण नैसर्गिक रंग लावून खेळल्या गेलेल्या इकोफ्रेण्डली रंगपंचमीच्या बातम्या वाचल्या असतील. पण चक्क चिखलात माखून रंगपंचमी खेळण्याची ही ‘बबन’च्या टीमने सुरु केलेली प्रथा अनोखीच. ‘बबन’च्या टीमसोबत या अनोख्या धूळवडीचा स्थानिक नागरिकांनीही मनसोक्त आनंद लुटला. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘ख्वाडा’फेम दिग्दर्शक भाऊराव क-हाडे यांनी दिग्दर्शन केले आहे. या सिनेमाच्या मोशन आणि टीझर पोस्टरवर दोन प्रेमीयुगुल चिखलाने माखले असल्याचे दिसून येते. याचाच संदर्भ घेत म्हसे गावात अनेक प्रेमी जोडप्यांना घेऊन चिखलातील अनोखी धुळवड साजरी करण्यात आली. याबद्दल बोलताना सिनेमाचे दिग्दर्शक भाऊराव क-हाडे म्हणाले, महाराष्ट्र हा कृषिप्रधान राज्य असून, शेतक-याला येथे महत्वाचे स्थान आहे. शिवाय प्रत्येक शेतक-याची नाळ आपल्या मातीशी जुळलेली असते. गावच्या मातीच्या रंगाची आणि सुगंधाची तोड इतर कोणत्याही रंगात नसल्यामुळे, आपल्या मातीशी एकरूप होण्यासाठी अशी इतरांहून वेगळी ‘धुळवड’ साजरी करण्याचे आम्ही ठरवले.चिखलात रंगपंचमी खेळण्याची म्हसे गावक-यांची प्रथा आहे. ही प्रथा सर्वदूर पोहोचविण्याचाही ‘बबन’ टीमचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. धुळवडीच्या या अनोख्या पद्धतीबरोबरच पारंपारिक ‘होळी’ पेटविण्याच्या कार्यक्रमातही झाला. लेझीमच्या तालावर ठेका धरीत म्हसे ग्रामस्थांनी या होळीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाbhaurao karhadeभाऊराव क-हाडे