शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
3
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
4
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
5
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
6
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
7
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
8
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
9
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
10
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
11
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
12
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
13
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
14
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
15
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
16
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
17
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
18
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
19
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
20
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी

बबनराव ढाकणे अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, हजारोंचा जनसमुदाय

By साहेबराव नरसाळे | Updated: October 28, 2023 16:17 IST

गृहविभागाच्यावतीने पोलिसांनी हवेत तीन फैरी झाडून ढाकणे यांना मानवंदना दिली.

अहमदनगर : माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्यावर शनिवारी (दि.२८) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गृहविभागाच्यावतीने पोलिसांनी हवेत तीन फैरी झाडून ढाकणे यांना मानवंदना दिली. शासनाच्यावतीने मंत्री धनंजय मुंढे यावेळी उपस्थित होते. बबनराव ढाकणे अमर रहे, परत या परत या, अशा घोषणांनी यावेळी आसमंत दुमदुमून गेला.  ढाकणे हे निमोनियामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून आजारी होते. गुरुवारी रात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर शुक्रवारी दिवसभर ढाकणे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पाथर्डी येथील हिंदसेवाच्या वसतिगृहामध्ये ठेवण्यात आले. शनिवारी दुपारी १२.३० वाजता सजविलेल्या रथातून पाथर्डी शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे सुपूत्र प्रतापराव ढाकणे यांनी अग्नी दिला. बबनराव ढाकणे अमर रहे, परत या परत या अशा जोरदार घोषणांनी यावेळी आसमंत दुमदुमून गेला. अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते. शासनाच्यावतीने मंत्री धनंजय मुंढे, खासदार डॉ. सुजय विखे, सदाशिव लोखंडे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, भगवान गडाचे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्यासह आमदार व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ढाकणे यांना श्रद्धांजली वाहिली. 

यावेळी आमदार मोनिका राजळे, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार, बबनराव पाचपुते, सुरेश धस, माजी मंत्री पंडित दौंडी, नरेंद्र घुले, भिमराव धोंडे, चंद्रशेखर घुले, भानुदास मुरकुटे, साहेबराव दरेकर, केशवराव आंधळे, रामकृष्ण बांगर, विठ्ठल महाराज, रामकृष्ण महाराज, हर्षदा काकडे, प्रदुषण आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, प्रांतधिकारी प्रसाद मते, पोलिस उपअधीक्षक सुनिल पाटील, तहसिलदार शाम वाडकर, विजय गोल्हार, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे, सुशिला मोराळे, मोहटा देवस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, संतोष भारती महाराज, दादा महाराज नगरकर, सी. डी. फकीर, पांडुरंग अभंग, राजेंद्र फाळके, विठ्ठल लंघे, अभिषेक कळमकर, रामदास गोल्हार, योगिता राजळे, संदीप वर्पे, राधाताई सानप, अश्विनीकुमार घोळवे यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर