शहरं
Join us  
Trending Stories
1
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
2
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
3
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
4
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
5
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
6
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
7
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
8
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
9
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
10
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
12
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
13
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
14
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
15
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
16
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
17
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
18
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
19
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
20
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा

बी-बियाणे, औषधे आणि खतांसाठी सरकारने शेतकºयांना अुनदान द्यावे, राधाकृष्ण विखे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 14:20 IST

लोणी : कोरोना संकटावर मात करताना राज्‍य सरकारकडून शेतकरी जाणीवपुर्वक दुर्लक्षित केला गेला आहे का? असा प्रश्‍न उपस्थित करतानाच अगामी खरीप हंगाम लक्षात घेवून शेतक-यांच्‍या कर्जाचे पुनर्गठन करुन बी-बियाणे, औषधे आणि खतांसाठी शेतक-यांना अनुदान द्यावे. फळ पिकांबरोबरच भाजीपाल्‍यावर प्रक्रीया उद्योगांना अनुदान देण्‍याबरोबरच शेतीमालाच्‍या विक्रीसाठी  जिल्‍ह्यांच्‍या  सीमा मोकळ्या कराव्‍यात आणि ऊस तोडणी मजुरांनाही त्‍यांच्‍या गावी पोहचविण्‍यासाठी जिल्‍हा प्रशासनाने तात्‍काळ निर्णय करावेत ,अशा महत्‍वपुर्ण मागण्‍या माजी मंत्री आ. राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांच्‍याकडे केल्‍या आहेत.

लोणी : कोरोना संकटावर मात करताना राज्‍य सरकारकडून शेतकरी जाणीवपुर्वक दुर्लक्षित केला गेला आहे का? असा प्रश्‍न उपस्थित करतानाच अगामी खरीप हंगाम लक्षात घेवून शेतक-यांच्‍या कर्जाचे पुनर्गठन करुन बी-बियाणे, औषधे आणि खतांसाठी शेतक-यांना अनुदान द्यावे. फळ पिकांबरोबरच भाजीपाल्‍यावर प्रक्रीया उद्योगांना अनुदान देण्‍याबरोबरच शेतीमालाच्‍या विक्रीसाठी  जिल्‍ह्यांच्‍या  सीमा मोकळ्या कराव्‍यात आणि ऊस तोडणी मजुरांनाही त्‍यांच्‍या गावी पोहचविण्‍यासाठी जिल्‍हा प्रशासनाने तात्‍काळ निर्णय करावेत ,अशा महत्‍वपुर्ण मागण्‍या माजी मंत्री आ. राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांच्‍याकडे केल्‍या आहेत.याबाबत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात विखे यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्‍या आपत्तीनंतर राज्‍यातील कृषि क्षेत्रापुढे निर्माण झालेल्‍या  अडचणी आणि यावर उपाययोजनांबाबत सरकारने तातडीने निर्णय करावेत्कृषि व पणन विभागाच्‍या नियोजन शुन्‍य कारभाराचा मोठा फटका शेतक-यांना बसला आहे. सरकारच्‍या उदासीनतेमुळेच राज्‍यातील शेतकरी उध्‍वस्‍त झाला आहे.    लाखांचा पोशिंदा म्‍हणून शेतक-यांना या संकटाच्‍या काळात राज्‍य सरकारने दिलासा देण्‍याची गरज आहे. मात्र शासनाच्‍या अनुदानावर ज्‍या व्‍यवस्‍था पोसल्‍या जात आहेत, त्‍यांनीच शेतक-यांकडे पाठ फिरवली आहे. कृषि व पणन विभागाने समन्‍वय करुन या संकटाच्‍या काळात शेतकरी ते ग्राहक ही योजना प्रभावीपणे कार्यान्वित करण्‍याची गरज होती. पण ते होवू न शकल्‍यामुळे शेतक-यांचा माल ग्राहकांपर्यंत पोहचू शकला नाही. राज्‍यात कोल्‍ड  स्‍टोअरेज,पॅकींग, ग्रेडींग व प्रक्रीयेच्‍या अपु-या व्‍यवस्‍थेमुळे शेतक-यांना आपला माल शेतातच नांगरणी करुन मातीमोल करावा लागला. अत्‍यावश्‍यक सेवेच्‍या नावाखाली जर इतर दुकानांना सरकार आता परवानगी देतच असेल तर शेतक-यांनाही शहरांमधील मैदाने व मोकळ्या जागा भाजी आणि फळ विक्रीसाठी उपलब्‍ध करुन देण्‍याची मागणी आ. विखे पाटील यांनी केली आहे. कृषि विभागाचे योग्‍य मार्गदर्शन शेतक-यांना मिळत नसल्‍यामुळे शहरांमध्‍ये कृषि माल घेवून जाणा-या शेतक-यांना पोलिसी आत्‍याचार सहन करावे लागतात व शेतमालाची नासाडी होवून आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत असल्‍याकडे त्‍यांनी लक्ष वेधले आहे.परप्रांतीय कामगारांबरोबरच ऊस तोडणी मजुरांचा प्रश्‍नही शासनाने गांभियार्ने घ्‍यावा. दुध उत्‍पादक शेतक-यांची होणारी लुट थांबवावी आणि कुकुट पालन व्‍यवसायीकांनाही राज्‍य सरकारने तातडीने विशेष पॅकेज जाहीर करण्‍याबरोबरच केंद्र सरकारने लॉकडाऊनच्‍या काळात दिलेल्‍या मार्गदर्शक सुचनांची राज्‍य सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणीही आ.विखे पाटील यांनी आपल्‍या पत्रात केली आहे.