यावेळी मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांच्यासह वसंत लोढा, प्रा. सुनील पंडित, मिलिंद मोभारकर, नितीन भुतारे, जागरूक नागरिक मंचचे सचिव कैलास दळवी, धनेश बोगावत आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुळे म्हणाले, २५ लाख रुपये खर्च करून उभारलेले सिग्नल गेल्या पाच वर्षंपासून बंद आहेत. कायनेटिक चौक, सक्कर चौक व स्वस्तिक चौक या गर्दीच्या ठिकाणी कायम वाहतुकीची कोंडी व अपघात होत आहेत. नगरची वाहतूक शाखा मात्र वर्धापन दिन साजरा करत आहे. प्रशासकीय अधिकारी रस्ता सुरक्षा अभियानात केवळ फोटोशेसन करण्यातच धन्यता मानत आहेत. मागील पाच वर्षांमध्ये वाहतूक शाखेमध्ये अनेक अधिकारी येऊन गेले. महपालिकेतही अनेक लोकप्रतिनिधी व महापौर होऊन गेले, परंतु एकानेही रस्ते आणि वाहतूक नियंत्रण, ट्रॅफिक सिग्नल याबाबत कोणताही ठोस निर्णय घेत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला नाही.
या आंदोलनात बाळासाहेब भुजबळ, जय मुनोत, राजेंद्र पडोळे, नंदप्रकाश शिंदे, किशोर जोशी, दत्ता गायकवाड, योगेश गणगले, मिलिंद कुलकर्णी, राम शिंदे, सुनील कुलकर्णी, प्रसाद कुकडे, भैरवनाथ खंडागळे, अमेय मुळे, करुणा कुकडे, मयुरी मुळे, सुरेखा सांगळे, आशा गायकवाड, मोहन लुल्ला, विष्णू सामल, राजेंद्र टकले, कसबे सर, घंगाळे सर, दीपक शिरसाठ, शारदा होशिंग, प्रकाश भंडारे, विजय देशपांडे, प्रमोद मोहळे आदी सहभगी झाले होते.
फोटो २२ आंदोलन १,२
ओळी - नगर शहरातील सक्कर चौकातील बंद असलेल्या सिग्नलला जागरुक नागरिक मंचने चपलांचा हार घालून प्रशासनाचा निषेध केला.