शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

मोबाईल गेममुळे पारंपरिक खेळाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 12:50 IST

इंटरनेटच्या अतिवापरामुळे बालगोपाळांसह तरूणांचे पारंपरिक खेळाकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

इसाक शेखबालमटाकळी : इंटरनेटच्या अतिवापरामुळे बालगोपाळांसह तरूणांचे पारंपरिक खेळाकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.पूर्वी शाळेतील सुट्टी, उन्हाळ्याच्या सुट्या किंवा इतर रिकाम्यावेळी बालगोपाळ, तरूण पारंपरिक खेळ खेळताना दिसत होते. मात्र सध्या स्मार्टफोन व सोशल मीडियामुळे लपंडाव, क्रिकेट, सागरगोटे,भोवरा,सुरपारंब्या, गोट्या, कबड्डी, खो-खो, विटी-दांडू,संगीतखुर्ची, साप शिडी, आठचल्लस, चंफूल, लगोरी,घोडी, शिवना पाणी, आंधळी कोशिंबीर अशा पारंपरिक खेळांची जागा स्मार्ट फोन व इंटरनेटने घेतली आहे. जुन्या खेळांमधून संघभावना, स्नेहभावना, एकमेकांना मदत करणे, जबाबदारीचे महत्त्व यासह नेतृत्वगुण सहजतेने विकसित होणे असे गुण वाढीस लागत होते. मामाच्या गावी हा खेळ खेळण्याची मजा काही वेगळीच होती.मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे मुलांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊन आरोग्य धोक्यात आले आहे. मुले व पालकांमध्ये संभाषण कमी होऊन सोशल मीडियावर मुलांचा जीव गुंतला आहे. काही मुले तर मोबाईलच्या अतिवापरामुळे वेगळ्या मार्गाने वाहत जाताना दिसत आहे. मोबाईलमुळे मुले व्यसनात गुरफटत चालली आहेत. अगदी पाच ते सहा वर्षांची लहान मुलेही स्मार्टफोनचा आग्रह धरू लागली आहेत. तरूणाई तर तासन्तास फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपवर व्यस्त असतात. एकत्र राहूनही प्रत्यक्ष आपापसात बोलण्याऐवजी मुले तासन् तास सोशल मीडियास प्राधान्य देत आहेत. या आभासी जगात लहान थोरांसह तरूण मुले पूर्णत: गुंतून गेलेली आहेत. या बाबींचा अतिरेक झाल्यामुळे मुलांमध्ये लहान व तरूण वयातच डोळ्यांचे विकार, डोकेदुखी, एकाग्रता नसणे, वाचनाकडे दुर्लक्ष, चिडचिडेपणा, एकलकोंडेपणा यासारख्या आदी समस्या मुलांमध्ये वाढत आहेत. त्यामुळे तरुणांच्या व लहान मुलांच्या व्यक्तिमत्वावर व कार्यक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता अभ्यासक व्यक्त करीत आहेत.मोबाईल व स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे लहान मुलांसह तरूणांमध्ये डोळ्यांचे आजार उद्भवत आहेत. मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे लहान मुलांचा बौद्धिक व शारीरिक विकास खुंटत चालला आहे. मोबाईलमुळे मुले हट्टी, एकलकोंडी होतात. मोबाईल घेऊन तासन्तास एका जागी बसून राहिल्यामुळे शारीरिक व मानसिक वाईट परिणाम झालेले दिसतात. सतत मोबाईलकडे पाहण्यामुळे डोळ्यांचा त्रास होतो. मुले बाहेर खेळायला न गेल्यामुळे शारीरिक वाढ खुंटते. प्रत्येक मोबाईलमध्ये इंटरनेट असल्यामुळे कोणतीही माहिती, व्हिडीओ पहायला मिळत असल्याने मुले आहारी जात आहेत. -डॉ. विठ्ठल बुधवंत, बालमटाकळी.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर