शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

निराधारांना आधार देण्यासाठी धडपडणारा अवलिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 13:46 IST

अपंग अहोरात्र तीन दिवस पायी पायी गल्ली न गल्ली फिरून घोटी गाव पिंजून काढले़ त्यातून भरगच्च पोवाड्याचा कार्यक्रम पार पडला.

भाऊसाहेब येवलेराहुरी : अपंग अहोरात्र तीन दिवस पायी पायी गल्ली न गल्ली फिरून घोटी गाव पिंजून काढले़ त्यातून भरगच्च पोवाड्याचा कार्यक्रम पार पडला. या अपंगाचे नाव होते गोपाल शिंदे़ गोपालपासून पे्ररणा घेत राहुरी येथील शिवशाहीर डॉ़विजय तनपुरे यांना अनाथ, दिव्यांग, वृध्द कलावंत, अनाथ, दुर्लक्षीत वृध्द व स्पर्धा परीक्षाचे केंद्र काढण्याची पे्रेरणा मिळाली़ त्यातून शिवाश्रम मेंढी (ता़सिन्नर) येथे लवकरच साकार होत आहे़शिवशाहीर बाबासाहेब देशमुख हे शाहीर तनपुरे यांचे गुरू़ त्यांनी आयुष्यभर शाहिरीतून २२०० अनाथ मुले पदवीधर केले होते़ शिवाश्रम पंढरपूर येथे सुरू केले होते़ परंतु देशमुख यांचे निधन झाल्याने प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही़ गुरूचे अपूर्ण राहिलेले स्वप्न राहुरीचे शिवशाहीर तनपुरे हे पूर्ण करीत आहेत़ शिवाश्रामासाठी ५० गुंठे जागा दानशुर मधुकर गीते यांनी दान म्हणून दिली आहे़ या जागेवर शिवाश्रम प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे़ शिवाश्रमामध्ये अपंगाना रोजगार व निवारा उपलब्ध करून देण्यात येणार आहे़अनाथ मुले आर्थिक अडचणीमळे प्रशासनापासून दूर आहेत़ त्यांना स्पर्धा परीक्षेचे व्दार खुले करून देण्यात येणार आहे़ विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी विना मोबदला १६ शिक्षकांनी तयारी दर्शविली आहे़ विद्यार्थ्यांना ग्रंथालय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे़ आॅनलाईन मार्गदर्शन मुंबई येथील संस्था करणार आहे़वृध्दांसाठी शेवटचे दिवस आनंदात जावे म्हणून आधार देण्यात येणार आहे़ त्यांच्या क्षमतेनुसार काम उपलब्ध करून देण्यात येणार आहे़ अंधांसाठी बे्रल लिपीचे शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे़ स्किल इंडिया अंतर्गत ६० विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे़ प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना शिवाश्रमात आॅनलाईनचे डाटा वर्कींग काम उपलब्ध करून देण्यात येणार आहे़शाहीर विजय तनपुरे यांनी पोवाडे व कीर्तनाच्या माध्यमातून आलेल्या रकमेचा २५ टक्के भाग बाजूला काढला होता़ त्यातून शिवाश्रम साकार होत आहे़ याशिवाय दानशूर व्यक्तींना बांधकाम साहित्य उपलब्ध करून दिले आहे़ वयाच्या दुसऱ्यावर्षी अपंगत्व आलेल्या शिवशाहीर तनपुरे यांनी सात समुद्रापलिकडे जाऊन शिवाजी महाराजाचे विचार पोवड्याच्या माध्यमातून पोहोचविले़ शिवाश्रमाच्या माध्यमातून चाललेली धडपड धडधाकट माणसाला दीपस्तंभ ठरावी अशी आहे़शिवाश्रम परिसरात गावरान गायींचा मुक्त गोठा तयार करण्यात येणार आहे़ अपंगाच्या स्किलनुसार या प्रकल्पातून बाय प्रॉडक्टचे काम उपलब्ध करून देण्यात येणार आहे़ प्रकल्पासाठी अनेकांनी मदतीचे हात पुढे केले आहे़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी