शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी बनविले कांदा काढणीचे स्वयंचलित यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 18:16 IST

नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष मॅकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात तयार केलेल्या व वापरण्यास सोपे असलेल्या स्वयंचलित कांदा काढणी यंत्राची निर्मिती केली आहे.

ठळक मुद्देछत्रपती अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे यश

अहमदनगर : नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष मॅकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात तयार केलेल्या व वापरण्यास सोपे असलेल्या स्वयंचलित कांदा काढणी यंत्राची निर्मिती केली आहे.जी. एच. रायसोनी युनिव्हर्सिटी (मध्य प्रदेश) यांनी आयोजित केलेल्या बेस्ट इनोव्हेशन अवॉर्ड २०१८ या स्पर्धेची दुसरी फेरी जी. एच. रायसोनी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग व मॅनेजमेंट, पुणे या ठिकाणी पार पडली. या स्पर्धेत छत्रपती अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तृतीय वर्षाच्या पाच विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. यात त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कांदा काढणीयंत्र हा प्रकल्प सादर केला होता. सध्याच्या काळात कांदा काढणी यंत्राची अनुपलब्धता व शेतक-यांची गरज लक्षात घेऊन विद्यार्थी प्रमोद वांढेकर, राहुल श्रीवास्तव, प्रणव दातीर, सुहास पाटसकर व प्रतीक बांड यांनी सर्वसामान्य शेतक-यांना परवडेल व सहजरित्या कोणत्याही ट्रॅक्टरला जोडता येईल असे कांदा काढणीयंत्र तयार केले आहे. या स्पर्धेत एकूण १२५ प्रकल्प सादर करण्यात आले होते. यात छत्रपती अभियांत्रिकीने द्वितीय क्रमांक पटकावला.स्पर्धेची तिसरी फेरी जी.एच. रायसोनी युनिव्हर्सिटी, मध्य प्रदेश या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी महाविद्यालयाचे विद्यार्थी हा प्रकल्प सादर करणार आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. देशपांडे, यांत्रिक विभागाचे विभागप्रमुख प्रा. एम. पी. नगरकर, प्रकल्प मार्गदर्शक प्रा.एच. बी. पवार व सर्व यांत्रिक विभागाच्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.काढणी यंत्राचे फायदेवेळेची बचत, कोणत्याही ट्रॅक्टरला सहजपणे जोडणी शक्य.कांदा, बीट, लसूण, बटाटा आदी पिकांची काढणी शक्य.मजुरांची गरज नाही.एक एकर कांदा काढणीसाठी ३-४ तासांचा वेळ.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरtechnologyतंत्रज्ञान