शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

भाजपा उपमहापौरांचे शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान; नगरमध्ये तणावपूर्ण स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 15:28 IST

शिवजयंती अवघ्या तीन दिवसांवर आली असताना मनपा कर्मचा-याला उद्देशून बोलताना उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले.

अहमदनगर-  शिवजयंती अवघ्या तीन दिवसांवर आली असताना मनपा कर्मचा-याला उद्देशून बोलताना उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. याची ऑडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नगरमध्ये वातावरण तणावपूर्ण बनले असून, छिंदम यांच्या कार्यालयाची शिवसेना, राष्ट्रवादी, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी प्रभागातील एका कामासाठी महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कर्मचा-यांची मागणी केली होती. कर्मचारी न पाठविल्यामुळे त्यांनी आज (दि. १६) सकाळी बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे याला फोन केला.बिडवे यांच्याशी बोलताना छिंदम यांनी अत्यंत अर्वाच्च भाषेत शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केले. या संवादाची ऑडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, कर्मचारी युनियननेही याची गंभीर दखल घेतली असल्याचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी सांगितले. दरम्यान, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, संभाजी कदम, अनिल शिंदे, योगीराज गाडे यांच्यासह शिवसैनिकांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून छिंदम यांच्याविरोधात तक्रार दिली. त्याचवेळी छिंदम यांचे कार्यालय व घरासमारे शिवसैनिक, राष्ट्रवादी व संभाजी ब्रिगेडचे कार्यकते मोठ्या संख्येने जमले. त्यांनी छिंदम यांच्या निषेधाच्या घोषणा देत कार्यालयाची तोडफोड करत गाड्या फोडल्या. याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.  उपमहापौर छिंदम यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची माहिती खासदार दिलीप गांधी यांनी दिली आहे. खासदार दिलीप गांधी यांच्या घरावरही दगडफेक करण्यात आली आहे. महापालिकेतील उपमहापौर छिंदम यांचे कार्यालय फोडले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन छेडलं आहे.

पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. त्यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी तेथून पळ काढला. मात्र, संभाजी ब्रिगेडचे गोरख दळवी यांना पोलिसांनी अटक केली. त्याचवेळी माजी आमदार राठोड यांच्यासह शिवसैनिकही मोठ्या संख्येने दाखल झाले. त्यांनी छिंदम यांच्या अटकेची मागणी केलीया संवादाची ऑडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, कर्मचारी युनियननेही याची गंभीर दखल घेतली असल्याचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी सांगितले. दरम्यान, शिवजयंती तोंडावर आलेली असताना भाजपच्या नेत्याने आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यातच उपमहापौर हे खासदार दिलीप गांधी गटाचे समर्थक असल्याने व मनपात शिवसेना व त्यांच्यात कायमचाच संघर्ष असल्याने भाजपला अडचणीत आणण्यासाठी शिवसेनेलाही आयते कोलीत मिळाले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर