शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

हिवरगाव पठार येथे कांदे चोरीचा प्रयत्न फसला  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 12:20 IST

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील हिवरगाव पठार येथे शेतात साठविलेला कांदा चोरट्यांनी चोरून गोण्यांमध्ये भरला. परंतु शेतक-याला जाग आल्याने चोरट्यांनी या गोण्या तेथेच टाकून पळ काढल्याने चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. 

घारगाव : कांद्याला सफरचंदाचा भाव आल्याने चोरट्यांनी आता कांदे देखील चोरण्यास सुरवात केली आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील हिवरगाव पठार येथे शेतात साठविलेला कांदा चोरट्यांनी चोरून गोण्यांमध्ये भरला. परंतु शेतक-याला जाग आल्याने चोरट्यांनी या गोण्या तेथेच टाकून पळ काढल्याने चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. संगमनेर तालुक्यातील पठारभागातील हिवरगाव पठार येथील शेतकरी संतोष दराडे यांची डोंगरालगत शेतजमीन आहे. या शेतातच त्यांनी काही प्रमाणात कांदा साठविलेला आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी हा कांदा चोरला. त्यानंतर तो गोण्यांमध्ये भरून साठविलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर गोण्या नेवून ठेवल्या. पुन्हा दुसºया ठिकाणी साठविलेला कांदा चोरट्यांनी चोरण्यास सुरवात केली. हा प्रकार सुरू असताना दराडे यांना जाग आली असता त्यांना साठविलेल्या कांद्याजवळ काही जण दिसले. त्यांनी लगेचच कामगारांना जागे करत आरडाओरड करण्यास सुरवात केली. त्यानंतर कांद्याजवळ उभ्या असलेल्या व्यक्तींनी पळ काढला. दराडे यांना चोर असल्याची खात्री झाली. त्यांनी विजेरीच्या प्रकाशात पाहिले असता कांदे चोरणारे सात ते आठ चोरटे त्यांना दिसले. पुढे काही अंतरावर त्यांनी जावून पाहिले असता सुमारे तीस गोण्यांमध्ये चोरट्यांनी चोरलेला कांदा भरून ठेवला होता. तेथेच कांदा भरण्यासाठी वापरात येणारे गोण्या, सुतळी आदी साहित्य पडलेले होते. चोरटे कांदा चोरत असताना दराडे यांना जाग आल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसल्याने शेतमालाची चोरी टळली. दरम्यान बाजारात कांद्याला सध्या प्रतिकिलो १०० ते १५० रुपये भाव मिळतो आहे. यापूर्वी देखील पठारभागात कांदे चोरीला जाण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे कांदा साठविलेल्या शेतकºयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्याने कांदा उत्पादक शेतकºयांना आता कांद्याला राखण बसण्याची वेळ आली आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी