पारेवाडी (ता.नगर ) येथे सोमवारी विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गाडे बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, पंचायत समिती सदस्य सुरेखा गुंड यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, पंचायत समिती सदस्य सुरेखा गुंड, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, सभापती काशीनाथ दाते, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस घनश्याम शेलार, जि.प. सदस्य संदेश कार्ले, शरद भाऊ झोडगे, गोविंद मोकाटे, प्रवीण कोकाटे, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र भगत, सुरेखा गुंड, डॉ. दिलीप पवार, गुलाब शिंदे, व्ही. डी. काळे, संदीप गुंड, सचिन शिंदे, तान्हाजी गुंड, नितीन शिंदे, दत्तात्रय शिंदे उपस्थित होते.
जिल्हा परिषद पंचायत समितीप्रमाणे मार्केट कमिटीही ताब्यात घेणार आहे. लोकशाही पद्धताने बँकेचे ठराव झाले तर कर्डिले यांना पंधराही मते पडणार नाहीत. गावात एक ठराव होतो. इकडे दुसऱ्यालाच उभे केले जाते. पांगरमल दारू हत्याकांडामध्ये कर्डिले यांच्या लोकांनी विषारी दारू पुरवल्यामुळे लोकांना जीव गमवावा लागला. श्रीगोंदा मतदारसंघात आमची चूक झाल्यामुळे घनश्याम शेलार यांचा पराभव झाला. पुढच्या वेळी शेलार यांनाच आमदार करणार, असे गाडे यांनी स्पष्ट केले.
...
फोटो -०८पारेवाडी
...
नगर तालुक्यातील पारेवाडी येथे विविध विकासकामाचे उद्घाटन करताना जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, प्रा. शशिकांत गाडे, काशीनाथ दाते, शरद झोडगे, घनश्याम शेलार, संदीप गुंड व ग्रामस्थ.