शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धर्माच्या नावाने देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:19 IST

संगमनेर : भारताची अर्थव्यवस्था दिशाहीन आहे. केंद्र सरकार गेल्या साडेसहा वर्षात अर्थव्यवस्थेला दिशा देवू शकले नाही. नोटबंदीनंतर आर्थिक प्रगतीचा ...

संगमनेर : भारताची अर्थव्यवस्था दिशाहीन आहे. केंद्र सरकार गेल्या साडेसहा वर्षात अर्थव्यवस्थेला दिशा देवू शकले नाही. नोटबंदीनंतर आर्थिक प्रगतीचा वेग सातत्याने कमी होत आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराचा प्रश्न निकाली निघाला असताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आता काशी, मथुरेचा वाद निर्माण केला जात आहे. धर्माच्या नावाने देशात पुन्हा अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर घातक परिणाम होत आहेत, अशी टीका भारतीय अर्थतज्ज्ञ डॉ.भालचंद्र मुणगेकर यांनी केली.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना विश्रामगृहात रविवारी (दि.१४) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २०१७ पासून भारतीय अर्थव्यवस्थेची घसरण सुरू आहे. याबाबत अर्थतज्ज्ञांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी विनंती केली होती. मात्र, मोदींनी त्याकडे दुर्लक्ष केले. दिल्लीत सरू असलेल्या शेतकरी आंदोलनाकडेही केंद्र सरकार लक्ष द्यायला तयार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारपेक्षाही शेतकऱ्यांची प्रतिष्ठा मोठी आहे. केंद्र सरकारने कुठलीही चर्चा न करता, संसदेत मंजूर केलेले कृषी कायदे मागे घेण्यासंदर्भात पुनर्विचार करण्याची गरज आहे, असेही डॉ.मुगणेकर म्हणाले.

केंद्र सरकारविरोधात बोलणाऱ्यांना धाक दाखविला जात आहे. सीबीआय आणि ईडीच्या माध्यमातून विरोधकांना वेठीस धरले जात आहे. रोजगार, महागाई, शिक्षण आदी मुद्द्यांवर सरकारकडे काहीही धोरण नाही. लोकांचा मोदी सरकारच्या शब्दावर विश्वास राहिलेला नाही. इंधनाचे दर वाढवून सरकार गोरगरिबांची लूट करीत आहे. जीएसटी मंजूर होऊन चार वर्षे झाली. मात्र, अद्यापही इंधनाला जीएसटीच्या कक्षेत समावून घेतले नसल्याने मोठे आ‌र्थिक नुकसान होत आहे. असेही मुणगेकर म्हणाले.

......

कृषीविषयक धोरण बदलण्याची गरज

शेतीमालाला किफायतशीर भाव मिळत नाही, ताेपर्यंत देशातील दारिद्र्य व विषमता बदलणार नाही. ६० टक्के शेतीवर आपला देश अवलंबून असून, ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने कृषीविषयक धोरण बदलले पाहिजे, असेही डॉ.मुगणेकर यांनी सांगितले.