शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; गुंडेगाव येथील धक्कादायक प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 17:28 IST

जेवणासाठी घरी बोलाविलेल्या शेतकरी मित्राने आग्रह करूनही मांसाहार न केल्याने दोघांनी त्याला टोकदार वस्तूने बेदम मारहाण करीत अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले़. या घटनेत पीडित शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़. नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे १४ आॅक्टोबर रोजी ही घटना घडली़. 

अहमदनगर : जेवणासाठी घरी बोलाविलेल्या शेतकरी मित्राने आग्रह करूनही मांसाहार न केल्याने दोघांनी त्याला टोकदार वस्तूने बेदम मारहाण करीत अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले़. या घटनेत पीडित शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़. नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे १४ आॅक्टोबर रोजी ही घटना घडली़.    या घटनेनंतर पीडित संजय पोपट जाधव (वय ४८ व्यवसाय शेती, रा़ गुंडेगाव ता़ नगर) यांनी जिल्हा रुग्णालयातून दिलेल्या जबाबावरून बापू एकनाथ हराळ व ज्ञानदेव उत्तम कुसळकर (दोघे रा. ग़ुंडेगाव) यांच्याविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. बापू हराळ हा आर्मीत जवान असून सुट्टीसाठी तो गुंडेगाव येथे आलेला आहे़. कुसळकर हा आर्मीतून निवृत्त आहे़. या दोघांनी १४ आॅक्टोबर रोजी संजय जाधव यांना घरी जेवणासाठी बोलाविले़ जाधव यांना जेवणात मांसाहार खाण्यास दिला. तो खाण्यास जाधव यांनी नकार दिला़. याचा राग येऊन हराळ व कुसळकर यांनी जाधवला गावातील मंगल कार्यालयासमोर नेऊन मारहाण केली़. तसेच त्यांच्या गुदद्वारात टोकदार वस्तू घालून जखमी केले़. त्यानंतर हराळ याने त्याच्याजवळील बाटलीतील पेट्रोल जाधव यांच्या अंगावर टाकून पेटवून दिले़. या घटनेत जाधव हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़. दरम्यान या घटनेने गुंडगावात खळबळ उडाली आहे़. फिर्याद दाखल झाल्यानंतर नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक शंकरसिंग राजपूत, उपनिरीक्षक राऊत यांच्या पथकाने हराळ व कुसळकर यांना अटक केली़. या दोघांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे़. याप्रकरणी पोलीस उपाधीक्षक अजित पाटील हे पुढील तपास करीत आहेत़. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगर