शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
3
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
4
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
5
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
6
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
7
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
8
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
9
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
10
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
11
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
12
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
13
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
14
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
15
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
16
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
17
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
18
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
19
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
20
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन

अहमदनगरमध्ये मतदान यंत्र तोडण्याचा प्रयत्न : बाबुर्डी बेंद येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 15:01 IST

ईव्हीएम मशीन विरोधात गेल्या अनेक वर्षांपासून लढणा-या जालिंदर चोभे यांनी आज दुपारी बाबुर्डी बेंद येथील मतदान केंद्रात लोखंडी टणक वस्तू मशीनवर मारून फोडण्याचा प्रयत्न केला.

अहमदनगर: ईव्हीएम मशीन विरोधात गेल्या अनेक वर्षांपासून लढणा-या जालिंदर चोभे यांनी आज दुपारी बाबुर्डी बेंद येथील मतदान केंद्रात लोखंडी टणक वस्तू मशीनवर मारून फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु निवडणूक कर्मचा-यांनी त्याला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. त्याच्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया दुपारी उशिरापर्यंत सुरू होती.जालिंदर चोभे यांचा गेल्या अनेक वर्षांपासून ईव्हीएम मशीन प्रणाली विरोधात लढा सुरू आहे. या ईव्हीएम मशीन विरोधात त्यांनी यापूर्वी अनेकदा आंदोलनेही केली आहेत. तसेच भारतीय निवडणूक आयोगाला वारंवार लेखी स्वरूपात निवेदनही दिलेली आहेत. आज सकाळी ते बाबुर्डी बेंद येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले होते. त्यांनी जाताना खिशात कुठलीतरी टणक लोखंडी वस्तू नेली होती. मतदान यंत्राजवळ मतदानासाठी आात गेल्यावर त्यांनी सदर वस्तू बाहेर काढली. ती जोरात मशीनवर मारली. एकदम आवाज येताच तेथे नियुक्तीस असलेल्या कर्मचा-यांनी त्यांच्याकडे धाव घेतली व त्यांना पकडले. पोलिसांनी ताब्यात घेऊन चोभे यांना सरकारी वाहनात नेले. तेथून नगर तालुका पोलीस ठाण्यात आणले.याप्रकरणी जालिंदर चोभे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. चोभे यांनी ईव्हीएम मशीनचा निषेध करण्यासाठी मतदान मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्याने निवडणूक अधिकारी व कर्मचारी घाबरून गेले होते. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019