शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हल्ल्यात चोरटे जखमी

By admin | Updated: February 17, 2016 22:41 IST

शेवगाव : धूमस्टाईलने महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळून जाणाऱ्या दोन चोरट्यांना पाठलाग करून पकडण्यात आले व बेदम चोप देऊन त्यांना शेवगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

शेवगाव : धूमस्टाईलने महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळून जाणाऱ्या दोन चोरट्यांना पाठलाग करून पकडण्यात आले व बेदम चोप देऊन त्यांना शेवगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. जमावाने केलेल्या मारहाणीत जबर जखमी झालेल्या दोन्ही चोरट्यांना नगर येथे हलविण्यात आले आहे. चित्रपटाच्या कथानकास शोभणारी ही घटना मंगळवारी रात्री आठच्या सुमारास शेवगाव-गेवराई रस्त्यावर घडली.शेवगाव-गेवराई रस्त्यावरून बाजारपेठेत सामान खरेदीसाठी निघालेल्या दिलशाद मुस्ताफ शेख या महिलेल्या गळ्यातील २१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण पल्सर मोटारसायकल गाडीवरून भरधाव चाललेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून गेवराई, पैठण रस्त्याकडे पळ काढला. महिलेने आरडाओरड करताच जवळच असलेल्या तिच्या मोमीन (वय २६) या मुलाने मोटारसायकलवरून चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. एका रुग्णालयाजवळ मोमीनने चोरट्यांच्या गाडीला आपली गाडी आडवी घालून त्यांना खाली पाडले. चोरट्यांशी त्याची झटापट सुरू असताना जमलेल्या जमावाने घटना लक्षात येताच चोरट्यांची यथेच्छ धुलाई केली व पोलिसांना पाचारण केले. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी या घटनेतील आरोपी सुरेश नामदेव चव्हाण व दगडू दादाराव काळे (दोघे रा. राजापूर, ता. गेवराई, जि.बीड) यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता या चोरट्यांनी काही वेळापूर्वी शहराच्या मुंडे चौकात जयश्री राजेंद्र पितळे या महिलेच्या गळ्यातील दीड तोळे सोन्याची पोतही धूमस्टाईलने लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. (तालुका प्रतिनिधी)