शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 11:04 IST

पाथर्डी : शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी गावच्या शिवारात घडली ...

पाथर्डी : शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी गावच्या शिवारात घडली आहे. ही घटना २ मे रोजी उघडकीस आली. याप्रकरणी पाथर्डी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. पोलीस सूत्राची माहिती अशी की, पंधरा वर्षीय अल्पवयीन पीडित मुलगी ही वीस दिवसांपूर्वी दोन शेळ्या चारण्यासाठी माणिकदौंडी गावाच्या शिवारात गेली होती. याचवेळी आरोपी शाहरुख बेग हा देखील शेळ्या चारण्यासाठी तेथे आला होता. यावेळी बेग याने बळजबरीने मुलीवर अत्याचार केला. याविषयी घरी काही सांगशील तर तिला जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपीने मुलीला धमकी दिल्याने तिने घरी काहीही सांगितले नाही. मात्र पुन्हा दहा दिवसांनी असाच प्रकार घडला. त्यावेळी देखील पीडित मुलगी घाबरलेली होती. त्यानंतर २ मे रोजी पुन्हा तिस-यावेळी संबंधित आरोपीने मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलीने आरडाओरड केल्यामुळे बाजूच्या शेतात असणा-या काही शेतक-यांनी धाव घेऊन सदर मुलीची सुटका केली. त्यानंतर मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात आरोपी शाहरुख शाम्मद बेग याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी हे करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डीCrime Newsगुन्हेगारी