श्रीरामपूर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातून युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी आज उमेदवारीच्या रिंगणात उडी घेतली आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी सेना-भाजपमध्ये बंडखोरी केल्यानंतर आता गायकवाड यांच्या रुपाने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतदेखील बिघाडी झाल्याचे चित्र आहे.आंबेडकरी चळवळीतील नेते गायकवाड यांनी श्रीरामपुरात पत्रकार परिषदेत आपल्या उमेदवारीची घोषणा केली. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सचिव अॅड.सादिक शिलेदार, भाऊसाहेब पगारे, राजेंद्र साठे, राजेंद्र वाघ, बाळासाहेब शिंदे, पोपटराव पुंड आदी उपस्थित होते.दरम्यान, शिवसेनेकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे, काँग्रेसकडून आमदार भाऊसाहेब कांबळे, अपक्ष माजी खासदार वाकचौरे, वंचित आघाडीचे डॉ.अरुण साबळे, भाकपचे बन्सी सातपुते यांच्यानंतर गायकवाड हे निवडणूक मैदानात उतरले आहेत. त्यातच रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) लढतीचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. सर्वच मोठ्या पक्षांत बंडाळी झाल्याचे चित्र आहे.मतदारसंघात काँग्रेस आघाडीकडून आपल्याला उमेदवारीचा शब्द देण्यात आला होता. माजी खासदार यशवंतराव गडाख यांनीही त्यासाठी प्रयत्न केला. त्यानुसार गेली दोन महिने आपण तयारी केली होती, असे गायकवाड यांनी यावेळी सांगितले. मात्र, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील गटबाजीमुळे ऐनवेळी येथे कांबळे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली.
lok Sabha Election 2019 शिर्डीतून युनायटेड रिपब्लिकनकडून अशोक गायकवाड मैैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 19:19 IST