शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

चित्रकाराच्या बोलक्या चित्रांनी वेधले लक्ष;  वृक्षांसह पाषाणही करतात कोरोनाबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 11:30 IST

वृक्षांसह दगड, पाषाणावर कोरोनाबाबत जनजागृती करणारे संदेश रेखाटण्याचे काम नेवासा येथील चित्रकार भरतकुमार उदावंत हे गेल्या ७१ दिवसांपासून करत आहेत. त्यांनी शहरासह तालुक्यातील अनेक गावात हा उपक्रम राबविला आहे.

सुहास पठाडे /सतीश उदावंत । 

नेवासा  : वृक्षांसह दगड, पाषाणावर कोरोनाबाबत जनजागृती करणारे संदेश रेखाटण्याचे काम नेवासा येथील चित्रकार भरतकुमार उदावंत हे गेल्या ७१ दिवसांपासून करत आहेत. त्यांनी शहरासह तालुक्यातील अनेक गावात हा उपक्रम राबविला आहे.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासूनच वात्रटिका, कविता, विनोदी व्यंगचित्राच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठी, इंग्रजी, हिंदी लेखनातून प्रबोधनाचे काम भरतकुमार उदावंत करीत आहेत. त्यांनी मागील ७० दिवसात दीडशेहून अधिक चित्र, शंभरहून अधिक कवितांच्या माध्यमातून प्रबोधन केले आहे.

   शहरी भागातून ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव होत आहे. त्यातच त्यावर उपाय नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ न देणे हेच  महत्त्वाचे आहे.  त्यासाठी कोणती खबरदारी घ्यायची याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. त्यासाठी जनजागृतीचे कामही गतिमान करण्यासाठी रस्त्याच्या बाजूची झाडे, दगड, पाषाण, भिंती यावर प्रबोधनपर चित्र रेखाटण्याची कल्पना उदावंत यांना सुचली. त्यांनी कोरोना जनजागृती संदेश दगड, झाडे यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविला. 

    कोरोना देशातून हद्दपार करायचाय, कोरोनाला हरवायचेय, मास्कचा वापर करा, वारंवार स्वच्छ हात धुवा, गर्दी टाळा, सुरक्षित अंतर ठेवा, घरीच रहा सुरक्षित रहा असे संदेश त्यांनी नेवासा शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी रेखाटले आहेत.यापूर्वी त्यांनी व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूणहत्या, स्वाईन फ्लू, ग्रामस्वच्छता अभियान, मतदान हे कर्तव्य आदीबाबत जनजागृती केली आहे.

चित्र आणि कविता हे जनजागृतीचे प्रभावी माध्यम आहे. चित्रकार भरतकुमार उदावंत यांनी कोरोनाच्या लढाईत झाडे-दगडांवर चित्र काढून जनतेचे लक्ष वेधले. त्यामुळे कोरोना जनजागृतीमध्ये प्रशासनाला मोठी मदत झाली. तेही कोरोना योद्धेच आहेत. -रूपेशकुमार सुराणा, तहसीलदार, नेवासा.

समाजहितासाठी जनजागृतीचे काम चित्रांच्या माध्यमातून अनेक वर्षापासून करत आहे. कोरोनासारख्या महामारीपासून जनतेचे संरक्षण व्हावे यासाठी मागील ७१ दिवसांपासून विविध माध्यमातून जनजागृतीचे काम करीत आहे.-भरतकुमार उदावंत, चित्रकार

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासाcorona virusकोरोना वायरस बातम्याartकला