मागणीचे निवेदन प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांना शुक्रवारी (दि.२२) देण्यात आले.
संगमनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, सुभाष सांगळे, सुरेश झावरे, निर्मला गुंजाळ, निखील पापडेजा, कचरु पवार, शालन गुंजाळ, विजय रहाणे, हैदरअली सय्यद, दत्तू कोकणे, शेखर सोसे, तात्या कुटे, शिवाजी गोसावी आदी यावेळी उपस्थित होते.
तांबे म्हणाल्या, गोस्वामी याला देशाच्या सुरक्षेसंदर्भातील अत्यंत गोपनीय माहिती कोणी दिली ? त्याने ती माहिती आणखी किती लोकांना दिली ? केंद्र सरकारमधील कोण महत्त्वाच्या व्यक्ती अर्णब गोस्वामीला गोपनीय आणि संवेदनशील माहिती पुरवत आहेत का ? अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. गोस्वामी आणि त्याच्या रिपब्लिक टीव्हीने अनेक बेकायदेशीर कृत्य केली असून दूरदर्शनची सॅटेलाईट फ्रिक्वन्शी बेकायदेशीर वापरून प्रसार भारतीचे करोडो रुपयांचे नुकसानही केले आहे. टीआरपी घोटाळ्याची चौकशी करताना या बेकायदेशीर कृत्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळेच जनतेचा पैसा लुबाडणा-या अर्णब गोस्वामी विरोधात केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी.
२२०१२०२१ काँग्रेस निवेदन ,
अर्णब गोस्वामी यांना अटक व्हावी, या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांना देण्यात आले.