शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डी खून व अत्याचार प्रकरणातील दोषींना शिक्षा सुनावण्यासाठी मंगळवारी युक्तिवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 19:24 IST

राज्यभर गाजलेल्या कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्यातील दोषींना शिक्षा सुनावण्यासाठी मंगळवारपासून जिल्हा व सत्र न्यायालयात युक्तिवाद करण्यात येणार आहे.

अहमदनगर : राज्यभर गाजलेल्या कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्यातील दोषींना शिक्षा सुनावण्यासाठी मंगळवारपासून जिल्हा व सत्र न्यायालयात युक्तिवाद करण्यात येणार आहे. या प्रकरणातील तिसरा दोषी नितीन गोपीनाथ भैलुमे याच्या वतीने अ‍ॅड़ प्रकाश आहेर हे प्रथम युक्तिवाद करणार आहेत.अ‍ॅड़ आहेर यांचा युक्तिवाद झाल्यानंतर दोषी जितेंद्र शिंदे व संतोष भवाळ यांच्या वतीने अ‍ॅड़ योहान मकासरे व अ‍ॅड़ बाळासाहेब खोपडे युक्तिवाद करणार आहेत. त्यानंतर सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम हे दोषींना काय शिक्षा द्यावी, यावर युक्तिवाद करणार आहेत. त्यानंतर न्यायालय दोषींना शिक्षा ठोठावणार आहे.कोपर्डी खून व अत्याचार प्रकरणातील मुख्य सूत्रधार जितेंद्र शिंदे याला १८ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने कटकारस्थान, छेडछाड, अत्याचार, खून तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली (पोक्सो) दोषी धरले. इतर दोघांना अत्याचार, खुनाच्या कटात सहभागी होणे व प्रोत्साहन देणे, तसेच पोक्सो कायद्याखाली दोषी धरण्यात आले. कायद्यातील या कलमांसाठी जन्मठेप अथवा फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे या आरोपींना आता काय शिक्षा मिळणार, याबाबत उत्सुकता आहे. कोपर्डी खटल्यातील संवेदनशीलता लक्षात घेऊन जिल्हा न्यायालयात मंगळवार व बुधवारीही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरkopardi caseकोपर्डी खटलाKarjatकर्जतCourtन्यायालय