शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

गट-तट न पाहता छावण्या मंजूर करा : रोहित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 16:48 IST

दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत आहेत. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे.

अहमदनगर : दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत आहेत. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे प्रशासनाने कोणताही गट-तट न पाहता छावण्या मंजूर कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे केली.शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन छावण्या, टँकर व कुकडीच्या आवर्तनासंदर्भात चर्चा केली. जिल्ह्यात मोठ्या संख्येने छावण्यांची गरज असून प्रशासनाने तातडीने छावण्या मंजूर कराव्यात. याशिवाय काही ठिकाणी छावण्यांना मंजुरी मिळूनही छावण्या सुरू होत नसल्याने जनावरांची गैरसोय होत आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची गरज आहे. परंतु टँकर सुरू झालेले नाहीत. तातडीने कुकडीचे आवर्तन सोडून गावतलाव भरून घ्यावेत, अशी मागणी पवार यांनी केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक आश्वासन देऊन छावण्या, टँकर सुरू करण्याबाबत सांगितले. मंजूर केलेल्या छावण्या आठ दिवसांत सुरू न केल्यास त्या रद्द करण्याची कार्यवाही होत असल्याचेही जिल्हाधिकाºयांनी सांगितले, असे पवार म्हणाले.वादापेक्षा पिडितांना मदत करामुंबईतील पूल दुर्घटनेबाबत बोलताना पवार म्हणाले की, ही घटना दुर्दैवी आहे. अशा प्रसंगी पिडितांना मदत करण्यापेक्षा तो पूल रेल्वेकडे होती की महापालिकेकडे, असा वाद करून जबाबदारी ढकलण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू झाला आहे. पूल कोणाच्याही अधिकारात असला तरी प्रथम त्याची सुरक्षा महत्त्वाची आहे.कार्यकर्ता म्हणून प्रचारात उतरणारअहमदनगर लोकसभेच्या प्रचाराची जबाबदारी खास आपल्याकडे सोपविली असल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता, पवार म्हणाले, प्रचाराची जबाबदारी सर्वांकडेच आहे. शरद पवार, अजित पवार हेही राज्यभर भिरत आहेत, एक कार्यकर्ता म्हणून पक्षाचा प्रचार करणे माझी जबाबदारी आहे. त्यामुळे मीही जेथे कोठे जाईल, तेथे युवकांना, कार्यकर्त्यांना भेटत असतो.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर