शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

साई संस्थान कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 14:21 IST

साई संस्थानच्या कायम कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा व मागील फरक या महिनाअखेर देण्याचा निर्णय घेतल्याचे संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे यांनी सांगितले़

शिर्डी : साई संस्थानच्या कायम कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा व मागील फरक या महिनाअखेर देण्याचा निर्णय घेतल्याचे संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे यांनी सांगितले़साई संस्थान व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेऊन मान्सून धमाका केला आहे़ या व्यवस्थापनाची मुदत तीन आठवड्यात संपत आहे़ व्यवस्थापनाच्या बैठकीनंतर हावरे यांनी निर्णयाबाबत माहिती दिली़ यावेळी विश्वस्त अ‍ॅड़ मोहन जयकर, भाऊसाहेब वाकचौरे, बिपीन कोल्हे, राजेंद्र सिंग, नगराध्यक्षा अर्चनाताई कोते, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे आदींची उपस्थिती होती़संस्थानने कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता़ या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी संस्थान व्यवस्थापनाबरोबरच गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनीही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता़ अखेर बुधवारी शासनाने याबाबत संस्थान व्यवस्थापनानेच निर्णय घ्यावा, असे पत्र संस्थानला पाठवले़ त्यानंतर गुरुवारी व्यवस्थापनाने वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला़१ जानेवारी २०१६ पासूनच्या फरकाचे जवळपास ५७ कोटी रूपये या महिनाअखेर कामगारांच्या खात्यात जमा होतील़ १ हजार ९५० कायम कर्मचाºयांना याचा लाभ होईल़ दरवर्षी यामुळे संस्थानवर २० कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे़याशिवाय अनुंकपामधील ६३ कर्मचाºयांना सेवेत घेण्याबरोबरच पूर्वीच्या अनुकंपातील कंत्राटी कामगारांनाही कायम करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला़ गेल्या वर्षीपासून संस्थान रूग्णालयात आऊट सोर्सिंगमध्ये काम करणाºया नर्सिंगच्या ४१ कर्मचाºयांना चाळीस टक्के पगारवाढ देण्याचा निर्णयही घेण्यात आला़यात साईबाबा रूग्णालयातील सहा व साईनाथच्या ३५ नर्सेसला याचा लाभ होईल़ स्टाफिंग पॅटर्न तयार करण्यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे़ स्टाफिंग पॅटर्न करून त्याला राज्य शासनाची मान्यता घेतल्यानंतरच कंत्राटी कामगारांना कायम करण्याच्या दृष्टीने पुढील प्रक्रिया करता येईल़ त्यासाठी चार-पाच महिने सबुरी ठेवा, असेही डॉ़ हावरे यांनी सांगितले़साईआश्रममधील आऊट सोर्सिंगच्या अतिरिक्त झालेल्या १२५ कर्मचाºयांच्या प्रकरणाचा आढावा घेऊन व्यवस्थापनापुढे मांडू असे मुगळीकर यांनी सांगितले़ पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या दर्शनरांग व शैक्षणिक संकुलाचे काम सुरू आहे़ सोलर प्लँट व नॉलेज पार्कचे टेंडर काढण्यात आले आहे़ संस्थान व शहरासाठी २० टन क्षमतेच्या घनकचरा प्रकल्पासही मान्यता दिल्याचे हावरे यांनी सांगितले़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर