शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरमधील आपेगावकरांना करावा लागतोय जीवघेणा जलप्रवास; रस्त्यासाठी संघर्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2022 10:55 IST

दोन हजार लोकसंख्येचे  आपेगाव ढोरा नदीपात्रामुळे विभागले गेले आहे.

- अनिल साठे 

शेवगाव (जि. अहमदनगर) :  आतापर्यंत रस्ता नसल्याने, खड्डेयुक्त, पाणंद, डोंगराळ भागातून नागरिक करत असलेला प्रवास पाहिला असेल. मात्र गावात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने, नागरिकांना चक्क जीवघेणा जलप्रवास करावा लागतो आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही शेवगाव तालुक्यातील आपेगावकरांचा रस्त्यासाठीचा संघर्ष कायम सुरूच आहे.

दोन हजार लोकसंख्येचे  आपेगाव ढोरा नदीपात्रामुळे विभागले गेले आहे. गावाला वस्तीवर जाण्या-येण्यासाठी नदीवर पूल नाही. त्यामुळे वर्षातून आठ महिने या गावकऱ्यांना धोकादायक जलप्रवास करावा लागतो आहे. लहान मुलांना, वृद्धांना व गावातील गरोदर महिलांना शेवाळलेल्या बंधाऱ्याच्या भिंतीवरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनास जाग येणार आहे का, असा सवाल ग्रामस्थांनी केला.

ग्रामस्थांची व्यथा...

या गावातील अण्णासाहेब बोरुडे म्हणाले, छातीइतक्या खोल पाण्यातून आम्हाला रोज येणे-जाणे करावे लागते आहे.  आजवर पाय घसरून दोघांचा जीव गेला आहे. पुलासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींसोबत नेहमीच भांडतो. पण आश्वासनाच्या पलीकडे काही मिळाले नाही, असे राहुल शेळके म्हणाले. 

सोबत नसेल तर बुडते शाळा

शाळकरी विद्यार्थी दादा शेळके म्हणाला, माझे पप्पा आजारी आहेत. त्यामुळं मला सोडवायला कुणीच नसते. शाळेत जायचे म्हटले की, पालकांना कामधंदा सोडून शाळेत सोडण्यासाठी व घेण्यासाठी यावे लागते. नदीतून तसेच बंधाऱ्याच्या भिंतीवरून जाताना भीती वाटते. कोणी नसले की, आम्ही घरीच राहतो, त्यामुळे माझी शाळादेखील बुडते.

मतदानावर बहिष्कार

शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे यांच्यासह राजू शेळके, बाबासाहेब शेळके, शंकर शेळके, विशाल बाबर, अण्णासाहेब बोरुडे, बाळासाहेब शेळके, रमेश वाघ, ज्ञानेश्वर शेळके आदी ग्रामस्थांनी. पूल न झाल्यास आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीदरम्यान मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर