याप्रकरणी पुरणचंद भोलादत्त जोशी (रा. पाइपलाइन रोड) यांनी गुरुवारी (दि. २४) भिंगार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. लॉरेन्स स्वामी याने २३ नोव्हेंबर २०२० रोजी किल्ला मैदानाजवळ फिर्यादी जोशी यांना गाडी आडवी घालून तसेच डोक्याला पिस्तूल लावून धमकी दिली. सैनिकनगर येथील प्लॉट माझ्या नावे कर, अन्यथा मला पन्नास लाख रुपये दे. तेव्हाच तुझ्या भावावरील गुन्हा मागे घेतो, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली, अशा फिर्यादीवरून भिंगार पोलीस ठाण्यात स्वामीविरुद्ध भादंवि ३८७/ ३४१ प्रमाणे खंडणीचा, तसेच आर्म ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी नेले होते.
पंधरा दिवसांपूर्वी लॉरेन्स यास भिंगार पोलिसांनी एका दरोड्याच्या गुन्ह्यात त्याच्या घरी जाऊन ताब्यात घेतले होते. त्यावेळी घर बंद करून तो आत बसला होता. पोलिसांनी सिनेस्टाइल त्याच्या घराचा दरवाजा तोडून त्यास अटक केली. विशेष म्हणजे त्या गुन्ह्यात त्याला दोन दिवसांपूर्वीच जामीन मिळाला होता.