काँगे्रसच्या पक्षांतर्गत निवडणुका जाहीर
By admin | Updated: April 27, 2017 18:40 IST
काँगे्रस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांच्या पक्षांतर्गत निवडणुका १५ मे रोजी घेण्याचा निर्णय प्रदेश काँगे्रसच्या बैठकीत घेण्यात आला़
काँगे्रसच्या पक्षांतर्गत निवडणुका जाहीर
काँगे्रसच्या पक्षांतर्गत निवडणुका जाहीरलोकमत आॅनलाईनअहमदनगर : काँगे्रस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांच्या पक्षांतर्गत निवडणुका १५ मे रोजी घेण्याचा निर्णय प्रदेश काँगे्रसच्या बैठकीत घेण्यात आला़ प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन (मुंबई) येथे पक्षाची बैठक झाली़ या बैठकीत चव्हाण यांनी २०१० च्या ब्लॉक संख्यप्रमाणे जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष निवडीसाठी निवडणुका घेण्याची घोषणा केली़ या बैठकीला नगरचे काँग्रेस जिल्हाध्यख जयंत ससाणे, नगर शहर अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, संगमनेर तालुकाध्यक्ष प्रताप ओव्हळ, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सचिन गुजर आदी उपस्थित होते़ नगर जिल्ह्यात ग्रामीण व शहरजिल्हा असे दोन जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांच्या निवडी १५ मे रोजी होणार आहेत़ विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रनिहाय बुथ प्रतिनिधी, क्रियाशील सभासद, सामान्य सभासद, जिल्हा प्रतिनिधी, प्रदेश प्रतिनिधी यांच्या निवडी होतील, त्यानंतर निवडणुकीची प्रारुप व अंतिम मतदार यादी तार करण्यात येणार आहे़ या मतदार यादीनुसार निवडणुका पार पडतील, असे नगर शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी सांगितले़