शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

समन्वय समितीच्या बैठकीत अण्णांच्या आंदोलनाची रणनीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 12:37 IST

लोकपाल, शेतक-यांचे प्रश्न व निवडणूक सुधारणा आदी मागण्यांबाबत नवी दिल्ली येथे २३ मार्चपासून सुरू होणा-या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सत्याग्रह आंदोलनाची रणनीती आखण्यासाठी राष्ट्रीय समन्वय समितीची पहिली बैठक शनिवारी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात पार पडली

राळेगणसिद्धी : लोकपाल, शेतक-यांचे प्रश्न व निवडणूक सुधारणा आदी मागण्यांबाबत नवी दिल्ली येथे २३ मार्चपासून सुरू होणा-या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सत्याग्रह आंदोलनाची रणनीती आखण्यासाठी राष्ट्रीय समन्वय समितीची पहिली बैठक शनिवारी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात पार पडली. आंदोलनाची तयारी गतिमान करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.बैठकीत मार्गदर्शन करताना अण्णा म्हणाले, माझे जीवन आता जास्त नाही. जे जीवन मी जगत आहे, ते बोनस असून जोपर्यंत प्राण आहे, तोपर्यंत समाज व देशासाठी जीवन जगण्याचा माझा निर्धार आहे. भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन संघटनेसाठी चारित्र्यशील लोकांचे संघटन आवश्यक आहे. भविष्यात आंदोलन कायमस्वरूपी राहण्यासाठी राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर चारित्र्यशील लोकांचे संघटन तयार झाले तर कोणतेही सरकार असो नाक दाबले की त्यांचे तोंड उघडेल. सरकारवर एक दबाव गट असायला हवा. आंदोलन चारित्र्यावर आधारित हवे. फक्त गर्दी जमवून काही होणार नाही. कार्यकर्त्यांनी ध्येयवादी असायला हवे. समन्वय समितीच्या सदस्यांनी आपापल्या राज्यात, जिल्हा व तालुक्यात भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाच्या शाखा तयार कराव्यात. परंतु, आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करणे गरजेचे आहे. आंदोलनासाठी दानशूर व्यक्तींकडून मदत घ्या. परंतु, ती रोख स्वरूपात नको.नवी दिल्लीतील आंदोलनासाठी कर्नल नैन, कमांडर यशवंत, मनिंद्र जैन यांनी आंदोलनाची जागा व प्रशासकीय बाबींची, प्रचार-प्रसार मटेरिअल डिझायनिंगची जबाबदारी सुनील लाल, आंदोलकांसाठी भोजन व्यवस्था करनवीर व सुनील फौजी यांनी स्वकारली आहे. बैठकीस डॉ. राकेश रफिक (वाराणसी ), अक्षय कुमार (ओडिशा), विनायक पाटील, कल्पना इनामदार, शिवाजी खेडकर (महाराष्ट्र), कमांडर यशवंत, कर्नल नैन (दिल्ली), सुशील भट्ट, भोपाल सिंह चौधरी (उत्तराखंड), गौरवकांत शर्मा, प्रताप चंद्रा, सुनील लाल, के. पी. एन. कल्कि ( उत्तर प्रदेश), राम नाईक ( कर्नाटक), दशरथ कुमार (राजस्थान), करनवीर थामन ( पंजाब ) आदींसह २४ सदस्य उपस्थित होते.

सोशल मीडियाला सूचना

इलेक्ट्रॉनिक मीडियाने नवी दिल्ली येथे होणाºया आंदोलनाच्या जनजागृतीकडे दुर्लक्ष केले आहे. कारण त्यांच्यावर केंद्र सरकारचा दबाव असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जास्तीत जास्त प्रचार-प्रसार करण्याच्या सूचना अण्णा हजारे यांनी दिल्या.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारे