शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा हजारे यांचे मौन आंदोलन सुरू; निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:30 IST

निर्भया प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, राष्ट्रीय पातळीवर महिलांसाठी हेल्पलाईन ठेवावी, या व इतर विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी सकाळी राळेगणसिध्दी (ता. पारनेर) येथील संत यादवबाबा मंदिरात जाऊन यादवबाबांचे दर्शन घेऊन मौन आंदोलनास प्रारंभ केला.

पारनेर : निर्भया प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, राष्ट्रीय पातळीवर महिलांसाठी हेल्पलाईन ठेवावी, या व इतर विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी सकाळी राळेगणसिध्दी (ता. पारनेर) येथील संत यादवबाबा मंदिरात जाऊन यादवबाबांचे दर्शन घेऊन मौन आंदोलनास प्रारंभ केला.देशभरात महिलांवर अत्याचार होत आहेत. मात्र या प्रकरणातील अनेक निकाल वेगवेगळ्या न्यायालयात प्रलंबित आहेत. दिल्लीतील निर्भया प्रकरणात सुध्दा आरोपींना अद्यापही फाशी देण्यात आली नाही. या दिरंगाईमुळे अनेक ठिकाणी महिला व युवतींवरील अत्याचार करणा-या नराधमांचे धाडस वाढत आहे. असे प्रकार हे दुर्दैवी आहेत. २०१२ पासून संसदेत ज्युुडीसीईल हा कायदा प्रलंबित आहे. तो कायदा झाल्यास न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तातडीने सुटण्यास मदत होईल. पोलीस ठाण्यात महिलांना एखादी तक्रार दाखल करायची झाल्यास तेथे पुरुष कर्मचारी, अधिकारी असल्याने महिलांना माहिती सांगण्यात अडचणी येतात. त्यामुळे पोलीस ठाण्यात महिलांच्या तक्रारी घेण्यासाठी महिला कर्मचारी, अधिकारी यांना नेमण्यात यावे. राष्ट्रीय पातळीवर महिलांसाठी हेल्पलाईन ठेवावी, अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे...... 

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेralegaon-acराळेगावNirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेप