राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. लोकपाल, लोकायुक्त व शेतक-यांच्या प्रश्नासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे काल राळेगणसिद्धी येथील संत यादवबाबा मंदिरात उपोषणाला बसले आहेत. अण्णांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून अद्याप सरकारकडून कोणतीही हालचाल झाली नाही.आज राळेगणसिद्धीचे ग्रामस्थ व पारनेर तालुक्यातील सर्व नागरिक तहसिल कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देणार आहेत. राळेगणसिद्धीमध्ये आज संपूर्ण दिवस गावकरी उपोषणाला बसणार असल्याचे माहिती उपसरपंच लाभेष औटी यांनी सांगितले.
अण्णा हजारे यांचा उपोषणाचा आज दुसरा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 11:04 IST