राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून अद्याप सरकारकडून कोणतीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे राळेगणसिद्धी परिवार आज भाजप सरकारचा प्रतिकात्मक पुतळ््याचे दहन करण्यात आले. यावेळी उपसरपंच लाभेष औटी व माजी स्वीय सहाय्यक सुरेश पठारे यांच्यासह मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित होते.राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याही पुतळ््याचे दहन यावेळी करण्यात आले.
अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस : राळगेणसिध्दीमध्ये सरकारचे पुतळा दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 11:03 IST