शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दारुबंदीच्या सुधारित मसुद्याबाबत अण्णा हजारे-बावनकुळे यांच्यात चर्चा

By admin | Updated: April 19, 2017 13:53 IST

राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दुपारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली़

आॅनलाइन लोकमतराळेगणसिद्धी (अहमदनगर) दि़१९- उर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दुपारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली़ या दोघांमध्ये तब्बल दीड तास बंद खोलीत चर्चा सुरु होती़ चर्चेचा अधिकृत तपशील समजू शकला नाही़ मात्र, दारुबंदीच्या सुधारित मसुद्याबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येते़बुधवारी सकाळी ११़३० वाजता महावितरणचे वरिष्ठ अधिकारी राळेगणसिद्धीत दाखल झाले़ त्यांनी अण्णा हजारे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली़ त्यानंतर १ वाजण्याच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क मंत्री बावनकुळे राळेगणसिद्धी येथे दाखल झाले़ त्यानंतर १२ वाजता त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कार्यालयात भेट घेऊन अण्णांशी विविध विषयांवर चर्चा केली़ यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, पारनेरच्या तहसीलदार भारती सागरे आदी उपस्थित होते़ हजारे-बावनकुळे यांच्यातील चर्चा बंद खोलीत सुरु होती़ तेथे पत्रकार किंवा अन्य कोणत्याही पदाधिकाऱ्यांना जाण्यास मज्जाव करण्यात आला होता़ त्यामुळे चर्चेचा सविस्तर तपशील मिळू शकला नाही़ मात्र, दोघांमध्ये दारुबंदीच्या सुधारित मसुद्याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते़ पांगरमल दारुकांडाबाबत बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांची हजारे यांच्यासमोरच झाडाझडती घेतली़ अण्णा हजारे यांनीही या तपासाबाबत नाराजी व्यक्त करीत सरकारी कार्यालयातच बनावट दारु तयार केली जात असूनही अधिकाऱ्यांनी माहिती नव्हती का, असा सवाल उपस्थित केला़