राष्ट्रीय शिक्षण मंडळ व राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूल यांच्या वतीने मंडळाचे सदस्य शरदराव भामरे, मुख्याध्यापक जगन्नाथ बोडखे यांच्या हस्ते जगताप यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे कैलास पोटे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मधुकर तांदळे व जगताप कुटुंबीय उपस्थित होते. कैलास पोटे यांनी जगताप यांच्या कार्य कर्तृत्वाचा गौरव केला. माजी मुख्याध्यापक मधुकर तांदळे, बन्सी ननवरे, बाळकृष्ण पात्रे, आयुब सय्यद तसेच चांद सुलताना हायस्कूलच्या शिक्षकांनी त्यांचा सत्कार केला. कलाशिक्षक बोटे यांनी चित्र भेट दिले. यावेळी शिक्षक बाबासाहेब लोंढे, सतीश काळे, रामनाथ घनवट, कविराज बोटे, सुशील नन्नवरे, आबासाहेब बेडके, वसतिगृहाचे अधीक्षक संजय बोबडे, अशोक चव्हाण, तुकाराम विघ्ने, विजय वाणी, निवृत्त कर्मचारी शिरसे, वनराज ढवळे आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूलमधील तंत्र शिक्षक अनिल जगताप सेवानिवृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:23 IST