शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त शेतक-यांनी महावितरणच्या विसापूर उपकेंद्राला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 18:30 IST

विजपुरवठा सुरळीत होत नसल्याने संतप्त शेतक-यांनी विसापूर (ता.श्रीगोंदा) येथील महावितरणच्या उपकेंद्राला आज दुपारी रोजी टाळे ठोकून निषेध केला. आंदोलनानंतर तात्काळ विजपुरवठा सुरू करण्यात आला.

विसापूर : विजपुरवठा सुरळीत होत नसल्याने संतप्त शेतक-यांनी विसापूर (ता.श्रीगोंदा) येथील महावितरणच्या उपकेंद्राला आज दुपारी रोजी टाळे ठोकून निषेध केला. आंदोलनानंतर तात्काळ विजपुरवठा सुरू करण्यात आला.गेल्या आठवड्यापासून विसापूर उपकेंद्रातुन होणारा विजपुरवठा विस्कळीत झाला होता. सुरेगाव,उखलगाव व घुटेवाडीकडे जाणा-या विद्युत लाईन अत्यंत जुनाट झाल्यामुळे सतत तारा तुटणे व पोल पडण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील आठवड्यात वादळात अनेक पोल पडल्याने व तारा तुटल्याने विसापूर गाव व स्टेशनचा काही भाग चार दिवस अंधारात होता. विसापुर तलाव व मुंगुसगावचे लाईनवर लोड येत असल्याने विज पुरवठा सतत खंडीत होत आसल्याने सुरेगाव व मुंगुसगावचे शेतक-यांनी विसापूर उपकेंद्राला टाळे ठोकले. पाऊस नसल्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. जे पाणी उपलब्ध आहे त्यामध्ये शेतकरी आपली उभी असणा-या पिकांना वाचवण्याचा कसाबसा प्रयत्न करत आहेत. त्यात वारंवार होणा-या विजेची समस्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.यावेळी कुकडी साखर कारखान्याचे संचालक अंकुश रोडे, सचिन जठार, तात्या भोसले उपस्थित होते. शेतक-यांशी महावितरणचे कनिष्ठ अभियंता दिपक सिंग यांनी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा