शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना उपाययोजनातील सर्व कामांचा भार अंगणवाडी सेविकांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 22:40 IST

कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने विविध सरकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना घरबसल्या काम करण्याची मुभा आहे. दुसरीकडे गावपातळीवर अल्प मानधनावर काम करणा-या अंगणवाडी सेविकांवर मात्र विविध जबाबदा-या टाकण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे सर्व अंगणवाड्या बंद आहेत. मात्र, असे असतानाही अंगणवाडी सेविकांवर प्रचंड कामाचा ताण येऊन पडला आहे.

अहमदनगर : कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने विविध सरकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना घरबसल्या काम करण्याची मुभा आहे. दुसरीकडे गावपातळीवर अल्प मानधनावर काम करणा-या अंगणवाडी सेविकांवर मात्र विविध जबाबदा-या टाकण्यात आल्या आहेत.कोरोनामुळे सर्व अंगणवाड्या बंद आहेत. मात्र, असे असतानाही अंगणवाडी सेविकांवर प्रचंड कामाचा ताण येऊन पडला आहे. अंगणवाडीतील जे लाभार्थी आहेत त्यांना घरपोहोच आहार पुरविण्याची जबाबदारी सेविका व मदतनीस यांचेवर टाकण्यात आली आहे. परगावहून जे नागरिक गावात सध्या स्थलांतरित झाले आहेत त्या सर्व नागरिकांची नोंद सेविकांनी ठेवायची आहे. या नागरिकांसोबत तीन ते सहा वयाची मुले असतील तर त्यांचीही नोंद ठेऊन त्यांना घरपोहोच आहार द्यावयाचा आहे.ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे असणारे (सारी) रुग्ण गावात आहेत का? हे तपासण्यासाठी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व आशा सेविका यांनी आजपर्यंत गावात तीन वेळा सर्वे केला आहे. सध्या गावांमधील शाळांमध्ये अनेक नागरिक क्वारंटाईन करुन ठेवले आहेत. या नागरिकांची सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत देखभाल करण्याची जबाबदारीही बहुतांश गावात अंगणवाडी सेविकांवर टाकण्यात आली आहे.अंगणवाडी सेविकांना सध्या मासिक आठ हजार, तर मदतनीस यांना पाच हजार रुपये मानधन मिळते. मात्र अल्प मानधन असतानाही गावपातळीवरील सर्व कामे त्यांचेवर सोपविण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी सेविका व मदतनीस यांना साधे मास्क व सॅनिटायझर देखील देण्यात आलेले नाही. वरिष्ठ सरकारी अधिकारीही या कामाची दखल घेताना दिसत नाहीत. नियमित पगार घेणाºया इतर सरकारी कर्मचा-यांवर ही कामे सोपविण्यापेक्षा प्रशासनाने सेविकांवर कामे सोपविण्याचा सपाटा लावला आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांवर काही कामे सोपविण्यात आली आहेत. मात्र त्यासाठी निवडक शिक्षक आहेत.

अंगणवाडी सेविकांवर सध्या अनेक कामे सोपविण्यात आली आहेत. यात या महिलांच्या आरोग्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. कोरोना ही जागतिक आपत्ती आहे. या आपत्तीत अंगणवाडी सेविका आपली जबाबदारी नक्कीच निभावतील. मात्र केवळ त्यांचेवर कामे न सोपविता गावपातळीवर काम करणारे ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक व इतरही विभागाच्या सरकारी कर्मचाºयांवर समप्रमाणात व सक्तीने ही कामे सोपवली जाणे आवश्यक आहे. काही कर्मचारी दिवसरात्र कामात व काहींवर काहीच जबाबदारी नाही हे धोरण अन्यायकारक आहे.- अ‍ॅड. निशाताई शिवूरकर, राज्य अध्यक्ष, अंगणवाडी कर्मचारी सभा

अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांच्यावर कोरोनाच्या आपत्तीत प्रचंड कामे लादली मात्र, त्यांना आरोग्याबाबत काहीही सुविधा व संरक्षण शासनाने दिलेले नाही. आशा सेविकांना सध्या काहीही मानधन नाही. शासन अक्षरश: त्यांना फुकट राबवून घेत आहे. तरीही शासनाकडे आशेने डोळे लावून हे कर्मचारी काम करत आहेत. या बाबीचा शासन कधीतरी विचार करणार आहे का? नियमित सरकारी कर्मचाºयांवर जेवढी जबाबदारी नाही ती जबाबदारी बिनपगारी काम करणाºया आशा कर्मचाºयांवर टाकण्यात आली आहे. ही कुठली मानवता आहे ?- काशिनाथ साबळे, जनशक्ती आशा व सुपरवायझर आरोग्य कर्मचारी संघटना

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस