शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाकडून अंगणवाडी सेविकेची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 12:17 IST

महसूल खात्यात नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून अंगणवाडी सेविकेस प्राथमिक शिक्षक व पाटबंधारे कर्मचाऱ्याने साडेतीन लाख रुपयांना गंडविले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.

नेवासा : महसूल खात्यात नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून अंगणवाडी सेविकेस प्राथमिक शिक्षक व पाटबंधारे कर्मचाऱ्याने साडेतीन लाख रुपयांना गंडविले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.सुलतानपूर येथील अंगणवाडी सेविका सुनीता राजेंद्र देशमुख यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार २०१५ मध्ये संजय सोन्याबापू आगळे व त्यांची पत्नी जनाबाई संजय आगळे (रा. नेवासा फाटा) यांनी पढेगाव येथील अनिल यादव रोकडे, अप्पासाहेब रामचंद्र देसाई व नितीन रामचंद्र देसाई (रा. वडाळा महादेव, ता.श्रीरामपूर) यांची मंत्रालयात ओळख असल्याने सुशिक्षित बेरोजगार महिलांना पैशाच्या मोबदल्यात ते सरकारी नोकरी लावून देत असल्याचे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून जवळ पैसे नसताना ही सरकारी नोकरीच्या आशेने मेहुणे संतोष पवार व भाऊ सागर देशमुख यांच्याकडून प्रत्येकी एक-एक लाख असे दोन लाख रुपये आणून या पाच जणांना जुलै २०१५ मध्ये दिले.१८ आॅगस्ट २०१५ रोजी त्यांनी महाराष्ट्र राज्य महसूल विभागांतर्गत सरळ सेवाभरतीत वरिष्ठ लिपिक म्हणून महिला राखीव प्रवर्गातील पद भरण्यासाठी निवड झाल्याचे नियुक्तिपत्र मिळाले. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी केली असता अशा प्रकारची कोणतीही नेमणूक झाली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी या आरोपींकडे चौकशी केली. उर्वरित दीड लाख रुपये मिळाल्यानंतर आयुक्त कार्यालयातून पत्र मिळेल, असे सांगितल्याने भावाकडून दीड लाख रुपये घेऊन आरोपींना दिले. त्यावर त्यांनी आयुक्तांचे नेमणूक पत्रही दिले. या पत्रात लिपिक पदावर नेमणूक झाल्याचे नमूद केले होते. पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्यावर हे पत्र ही बनावट असून, फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याबाबतीत उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर १२ फेब्रुवारी २०१८ रोजी अनिल रोकडे याने दिलेला साडेतीन लाख रुपयांचा धनादेश न वटता परत आला. जास्त तगादा केल्यावर १३ फेब्रुवारी २०१८ ला या पाच ही आरोपींनी सुलतानपूर येथे येऊन एक छदामही देणार नाही व कायद्याकडे धाव घेतल्यास तुला व मुलीला जीवे मारू, अशी धमकी ही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.आरोपींना २ आॅगस्टपर्यंत कोठडीमुख्य आरोपी जिल्हा परिषद शिक्षक संजय आगळे रा.नेवासा फाटा व लोणी पाटबंधारे कार्यालयातील अनिल रोकडे (रा.वडाळा महादेव ता.श्रीरामपूर) यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने २ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद