शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या अमिषाने वरपित्याला गंडविले : तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 10:38 IST

आपल्या मुलीशी लग्न लावून देतो, असे आमिष दाखवून मुलाच्या वडिलांना ५० हजार रुपयांना गंडविणाऱ्या मुलीचा पिता व मध्यस्थी करणारे अशा ५ जणांविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी ३ आरोपींना पोलिसांनी अटक के लेली आहे.

शेवगाव : आपल्या मुलीशी लग्न लावून देतो, असे आमिष दाखवून मुलाच्या वडिलांना ५० हजार रुपयांना गंडविणाऱ्या मुलीचा पिता व मध्यस्थी करणारे अशा ५ जणांविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी ३ आरोपींना पोलिसांनी अटक के लेली आहे.याबाबत रामनाथ अर्जुन हारदे (रा. गोटुंबे आखाडा, ता.राहुरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, ‘माझा मुलगा गणेश याचे गोपीनाथ जगन्नाथ जाधव (रा. बेलगाव ता. शेवगाव) यांच्या मुलीशी लग्न जमले होते. त्यासाठी शिवाजी रावसाहेब बनसोडे व रावसाहेब भिमाजी बनसोडे (रा. मळेगाव ता. शेवगाव) व दोन अनोळखी महिला यांनी मध्यस्थी केली होती. तसेच २७ मे रोजी विवाहाची तारीख निश्चित केली होती. त्या अगोदर शेवगाव येथील एका कापड दुकानात लग्नाच्या बस्त्याची खरेदी झाली. तसेच लग्नाच्या खर्चासाठी ५० हजार रुपये मुलीचे वडील व मध्यस्थांनी माझ्याकडून घेतले. परंतु लग्नाच्या अगोदरच्या दिवशी मुलीच्या वडिलांनी रात्री १२ वाजता फोन करून मुलगी कोठे तरी पळून गेली आहे, आम्ही तुमच्या मुलाबरोबर तिचे लग्न लावून देऊ शकत नाही. तुमचे पैसेही परत देणार नाही,’ असे सांगितले.पोलिसांनी या गुन्ह्यात मुलीचे वडील गोपीनाथ जगन्नाथ जाधव, मध्यस्थ शिवाजी रावसाहेब बनसोडे व रावसाहेब भिमाजी बनसोडे या तिघांना अटक केली आहे. परिक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक डॉ. निलभ रोहण, पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकाँस्टेबल संतोष धोत्रे तपास करीत आहेत.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगावahmednagar policeअहमदनगर पोलीस