शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील सर्व दुकाने उघडणार; मद्यविक्री, सलून मात्र बंदच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 11:52 IST

लॉकडाऊनची मुदत संपल्यानंतर केंद्राने अनेक सवलतींना परवानगी दिल्यामुळे जिल्हा प्रशासनाने या सवलती लागू केल्या आहेत. यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील सर्व दुकाने उघडणार असल्याचा आदेश प्रशासनाने काढला आहे. यामुळे ब‍ºयापैकी ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. मात्र जिल्ह्यातील कोणतीही मध्य विक्रीची दुकाने किंवा सलून दुकाने उघडणार नाहीत,

 अहमदनगर : दुसºया टप्प्यातील लॉकडाऊनची मुदत संपल्यानंतर केंद्राने अनेक सवलतींना परवानगी दिल्यामुळे जिल्हा प्रशासनाने या सवलती लागू केल्या आहेत. यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील सर्व दुकाने उघडणार असल्याचा आदेश प्रशासनाने काढला आहे. यामुळे ब‍ºयापैकी ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. मात्र जिल्ह्यातील कोणतीही मध्य विक्रीची दुकाने किंवा सलून दुकाने उघडणार नाहीत, असे प्रशासनाने स्पष्टपणे म्हटले आहे. देशात गेल्या २४ मार्चपासून लॉकडाऊन असल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प होते. सर्व दुकाने, आस्थापना बंद करण्याच्या सूचना होत्या. परंतु हळूहळू यात सवलत देण्यात आली. दुसºया टप्प्यातील लॉकडाऊन ३ मे रोजी संपल्यानंतर केंद्र शासनाने अनेक सवलतींना परवानगी दिली. त्याबाबत सोमवारी मध्यरात्री जिल्हा प्रशासनाने आदेश काढून काही सवलतींना मुभा दिली. यात ग्रामीण भागातील सर्व म्हणजे इलेक्ट्रॉनिक, स्टेशनरी, इतर दुरुस्तीची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.  महापालिका व नगरपालिका क्षेत्रातील एकल वसाहतीतील दुकाने उघडण्यात परवानगी आहे. मात्र या ठिकाणी पाचपेक्षा जास्त दुकाने सलग असतील ती मात्र बंदच राहणार आहेत. रहिवासी वसाहतीमध्ये पाचपेक्षा कमी दुकाने असतील तर ती सुरू राहणार आहेत.  सोशल डिस्टन्सिंगची खबरदारी सर्वांनी घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे. डिझेल २४ तास खुले डिझेल विक्रीच्या आधीच्या वेळेत बदल केला असून नवीन आदेशानुसार डिझेल २४ तास खुले राहील. पेट्रोलची वेळ मात्र पहाटे पाच ते सकाळी नऊ अशीच राहणार आहे. यात कोणताही बदल नाही.मद्यविक्रीची दुकाने बंदचप्रशासनाने ग्रामीण भागातील सर्व तसेच शहरी भागातील एकल वसाहतीतील दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश काढले असले तरी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुढील आदेश येईपर्यंत मद्य विक्रीची दुकाने खुली करू नयेत, असे स्पष्ट म्हटल्यामुळे मद्य विक्रीची कोणतीही दुकाने सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या