अहमदनगर : शिवाजीयन्स एफसी संघाने लॉरेन्स एफसी संघाचा २-१ असा पराभव करून चौथा अॅॅलेक्स फर्नांडेझ फुटबॉल करंडक पटकावला.किला मैदानावर अंतिम सामना काल पार पडला. लॉरेन्स एफसीच्या मनीष वादगळे याने सहाव्या मिनिटालाच गोल करून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर शिवाजीयन्स एससीच्या गौरव चावरे याने २३ व्या मिनिटाला गोल करून सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. पुर्वार्धात ही बरोबरी कायम होती. उत्तरार्धात आकाश गायकवाड याने ३८ व्या मिनिटाला निर्णायक गोल करून शिवाजीयन्स संघाला विजेतेपद मिळवून दिले. विजेत्या आणि उपविजेत्या पारितोषिकांसह इतरही वैयक्तिक पारितोषिके देण्यात आली. सर्वोत्कृष्ट गोलरक्षक रोहीत कुसाळकर (शिवाजीयन्स), सर्वोत्कृष्ट मध्यरक्षक अतुल नाईकवाल (शिवाजीयन्स), सर्वोत्कृष्ट स्ट्राईकर शुभम काळे व मालिकावीर अनुप भगत (शिवाजीयन्स) अशी पारितोषिके देण्यात आली. पारितोषिक वितरण शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरीयल फाऊंडेशनचे नरेंद्र फिरोदीया यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहूणे दिवगंत अॅलेक्स फर्नांडिस यांचे चिरंजीव रोनप फर्नांडिस, अनिता परेरा व नितीन परेरा होते.
शिवाजीयन्स एफसी संघानं पटकावला अॅलेक्स फर्नांडेझ फुटबॉल करंडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 13:53 IST