शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
3
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
4
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
5
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
6
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
7
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
8
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
9
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
10
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
11
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
12
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
13
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
14
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
16
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
17
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
18
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
19
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
20
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव

अकोलेच्या लेकीचा शोध! अवघ्या १५ मिनिटांत कोरोनाचे निदान; किटला एनआयव्हीकडून मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 19:38 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला की नाही याचे निदान अवघ्या १५ मिनिटात करणाऱ्या ‘टेस्ट किट’च्या निर्मितीत अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील संशोधक शितल रंधे-महाळुंकर हिचे मोठे योगदान आहे.

हेमंत आवारीअकोले : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला की नाही याचे निदान अवघ्या १५ मिनिटात करणाऱ्या ‘टेस्ट किट’च्या निर्मितीत अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील संशोधक शितल रंधे-महाळुंकर हिचे मोठे योगदान आहे. या किटला पुणे येथील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था (एनआयव्ही) यांच्याकडून मान्यता मिळाली आहे.शितल रंधे यांचे अकोले तालुक्यातील पिंपळदरी हे माहेर आहे. त्यांचे शिक्षण एम.एस्सी. बायोटेक झाले असून, त्या कुसगाव (पुणे) येथील ‘इम्नो’ सायन्स या कंपनीत संशोधन आणि विकास (रिसर्च अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट) विभागात प्रमुख आहेत. गेल्या चार-पाच वर्षांपासून त्या विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत. या कंपनीने प्रेग्नन्सी, डेंग्यु, एचआयव्ही, एचसीव्ही याचे निदान करणाऱ्या टेस्ट किट बनविल्या आहेत. कोरोना महामारीच्या संकटात विषाणू प्रादुर्भाव ओळखण्याची किट तयार करावी, अशी कल्पना पुढे आली. कंपनीतील शितल रंधे-महाळुंकर यांच्या नेतृत्वाखाली अतुल तरडे (एम.एस्सी.बायोटेक), अविनाश तुळसकर, अमृत कोरे, वर्षा गुंजाळ (ही पिंपळदरी, ता. अकोले येथील आहे), अवधुत सातपुते, ललित बारावकर, हनुमंत गोयकर यांनी संशोधनाच्या कामास सुरुवात केली. प्रथम किट बनवण्यासाठी परवानगी मिळवली. त्यासाठी लागणारा कच्चा माल भारताबाहेरुन मागविला. लॉकडाऊनमुळे हे साहित्य मिळण्यास थोडा विलंब झाला. तरीही जास्त वेळ मेहनत घेवून अल्पावधीत टेस्ट किट विकसीत केली आहे. किट पुण्यातील आयसीएमआर/ एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविल्या. दोन दिवसात एनआयव्ही पुणे कडून मान्यता मिळाली. सेंट्रल ड्रग स्टॅन्डर्ड कन्ट्रोल आॅरगनायझेशन (सीडीएससीओ) कडून तपासणी अहवाल आल्यानंतर कोरोनो विषाणू चाचणी किट उत्पादनाची परवानगी मिळाली आहे. १५ मिनिटांत कोरोना विषाणू प्रादुर्भाव झाला की नाही? याचे निदान या किटमुळे होते. लवकरच हे किट बाजारात उपलब्ध होत आहे.

संशोधन क्षेत्रात आवड होती. गेल्या चार वर्षांपासून कंपनीत संशोधन विभाग सांभाळते. एम.एस्सी. बायोटेक असलेले माझे काका अतुल तरडे यांच्यामुळे काम करण्याची संधी मिळाली. कोरोना महामारी संकटाच्या काळात आपल्या देशासाठी काहीतरी संशोधन कार्य करण्यात सहभाग नोंदवण्याचे भाग्य मिळाले याचे समाधान वाटते.- शितल रंधे-महाळुंकर

शितल शहरातील कन्या शाळेत दहावीपर्यंत तर बारावीपर्यंत अकोले महाविद्यालयात होती. पुणे विद्यापिठातून तिने बायोटेक मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. तिने मोठ्या संकटकाळात संशोधनातून देशासाठी चांगले योगदान दिले, याचा अभिमान पिंपळदरीसह सर्व अकोलेकरांना आहे.-हौशीराम बन्सी रंधे, शितलचे वडिल व माध्यमिक शिक्षक

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोलेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPositive on Coronaसकारात्मक कोरोना बातम्या