शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेच्या निळ्या भाताची मुख्यमंत्र्यांना भुरळ, व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे साधणार संवाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 15:06 IST

कोतुळ (जि. अहमदनगर): ‘लोकमत’ ने रविवारच्या अंकात ‘अकोलेत इन्डोनेशीयाच्या निळ््या भाताचा राज्यातील पहिला प्रयोग’ हे वृत प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषी मंत्री दादाजी भुसे हे गुरूवारी दहा सप्टेंबर रोजी थेट अकोले तालुक्यातील मेहंदुरीतील थेट शेतात व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधणार आहेत.

मच्छिंद्र देशमुख

कोतुळ (जि. अहमदनगर): ‘लोकमत’ ने रविवारच्या अंकात ‘अकोलेत इन्डोनेशीयाच्या निळ््या भाताचा राज्यातील पहिला प्रयोग’ हे वृत प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषी मंत्री दादाजी भुसे हे गुरूवारी दहा सप्टेंबर रोजी थेट अकोले तालुक्यातील मेहंदुरीतील थेट शेतात व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधणार आहेत, असे जिल्हा कृषी अधिकारी शिवाजी जगताप, विभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे व तालुका कृषी अधिकारी प्रविण गोसावी यांनी सांगीतले आहे. 

‘लोकमत’ने अकोल्यातील इन्डोनेशियाच्या निळ्या भाताचा आसाम ते अकोले प्रवास तसेच त्याचे निळा व ब्लॅक राइस असे झालेले नामकरण, मेहंदुरीतील शेतकरी विकास आरोटे यांनी तीन किलो बियाण्यापासून दहा एकर क्षेत्रात कृषी विभागाच्या सहकार्यातून वाढवलेले क्षेत्र याबाबत दिल्लीसह राज्यातील सर्व आवृत्तीत हे वृत्त प्रसिद्ध केले. 

या वृत्ताची राज्यातील कृषी क्षेत्रात मोठी चर्चा झाली. या भाताच्या वाणाचा मोह मुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांनाही आवरला नाही. गुरुवार ‘विकेल तेच पिकेल’ या कार्यक्रमाचे उदघाटन मुख्यमंत्री व कृषी मंत्री गुरवारी (१० सप्टेंबर) सकाळी साडेदहा ते साडे अकरा दरम्यान आॅनलाईन  व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे होणार आहे. त्यात मुख्यमंत्री थेट अकोल्यातील मेहंदुरीतील त्या भातशेतात लाइव्ह येणार आहेत. या तयारीसाठी आजपासूनच अकोले तालुका कृषी विभागाची लगबग सुरू झाली आहे. ------यांचा असेल सहभागमुंबईतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषी मंत्री दादा भूसे, राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धिरज कुमार, विभागीय कृषी सह संचालक दिलीप झेंडे हे सहभागी होणार आहेत. तर अकोलेतून (मेहंदुरीतून ) शेतकरी, विकास देवराम आरोटे,  विभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे , लोकमत प्रतिनिधी मच्छिंद्र देशमुख, तालुका कृषी अधिकारी प्रविण गोसावी हे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले