शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अकोले, संगमनेर, राहात्यानंतर नेवाशाला पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 15:53 IST

नेवाशात मंगळवारी (दि.२०) दुपारी जोरदार पाऊस झाला़ या पावसाने शेतकऱ्यांची दैना उडविली. काढलेली पिके पावसाने झोडपली. अनेकांच्या कांदा पिकाचे नुकसान झाले.

अहमदनगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरात, संगमनेर तालुक्यातील जवळेकडलग व राजापूर परिसरात तर राहाता तालुक्यातील बाभळेश्वर, कोल्हार परिसरात सोमवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. संगमनेर तालुक्यात काही ठिकाणी गारपिटीसह झालेल्या वादळी पावसामुळे पिके व फळबागांचे मोठे नुकसान झाले. नेवाशात मंगळवारी (दि.२०) दुपारी जोरदार पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांची दैना उडविली. काढलेली पिके पावसाने झोडपली. अनेकांच्या कांदा पिकाचे नुकसान झाले.संगमनेर तालुक्यातील उंबरी-बाळापूर, आश्वी खुर्द, आश्वी बुद्रुक, प्रतापपूर, ओझर, कनोली, चिंचपूर, खळी, पिप्रीं-लौकी अजमपूर, निमगावजाळी, जोर्वे, चणेगाव, कौठे-मलकापूर, अंभोरे, कोची, मांची, मालुंजे, पिंपरणे, हजारवाडी, पानोडी, शिबलापूर, औरंगपूर, रहिमपूर, मनोली आदी गावात सोमवारी दुपारी तीन वाजता कमी, जास्त प्रमाणात पाऊस झाला. जवळेकडलग येथे मका, कांदा आदी पिकांबरोबरच द्राक्ष व डाळिंब फळबागांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती जवळेकडलग येथील शेतकरी विजय देशमुख यांनी दिली. राजापूर येथेही पावसाने पिकांचे नुकसान झाले असून वादळी वाऱ्याने शिवारात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर महावितरणचे खांब, विज वाहक तारा खाली पडल्याने विजपुरवठा खंडित झाला. राजापूर-जवळे कडलग रस्त्यावरही झाडे पडल्याने वाहतुक विस्कळीत झाली होती. महसूल विभागाने तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतक-यांना शासनाकडून मदत मिळवून देण्याची मागणी मनोज रामभाऊ हासे, दशरथ लहानू हासे, सचिन बाळासाहेब हासे आदी शेतक-यांनी केली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासाAkoleअकोलेrahaataराहाताSangamnerसंगमनेर