शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

अकोल्यात पावसाची संततधार सुरूच, मुळा दुथडी

By admin | Updated: July 4, 2016 23:45 IST

अकोले : तालुक्याच्या पश्चिम घाटमाथ्यावरील ढगांच्या झुंबीमुळे घाटघर-रतनवाडी या भंडारदरा धरणाच्या पाणलोटात रुद्रावतारी पाऊस ओसरला असला

अकोले : तालुक्याच्या पश्चिम घाटमाथ्यावरील ढगांच्या झुंबीमुळे घाटघर-रतनवाडी या भंडारदरा धरणाच्या पाणलोटात रुद्रावतारी पाऊस ओसरला असला तरी सोमवारी दिवसभर जोरदार सरींसह रिमझिम पाऊस बरसला. सायंकाळी पावसाचा जोर वाढलेला होता. गेल्या २४ तासात भंडारदरा धरणात जवळपास ८०० दशलक्ष घनफूट अशी विक्रमी नव्या पाण्याची आवक झाली. त्यामुळे आता भंडारदऱ्याचा एकूण साठा १७७६ दशलक्ष घनफूट झाला आहे. सोमवारी सकाळी ६ वाजता गेल्या २४ तासात घाटघर येथे २०६, तर रतनवाडी २६८, पांजरे येथे १६९ व अकोल्यात १४० मिलीमिटर अशी विक्रमी पावसाची नोंद झाली. भात खाचरे पाण्याने तुडुंब भरली असून भात रोपे तरारली आहेत. भात खाचरातील तण काढणे व गाळ करण्याच्या कामांना सुरुवात झाली आहे. आता आदिवासी भागात भात आवणीचे वेध सुरु झाले आहे. सोमवारी सकाळी झालेली पावसाची नोंद मिलीमीटरमध्ये (कंसात यंदाचा एकूण पाऊस) भंडारदरा-१०४ (२६०), घाटघर-२०६ (७२३), रतनवाडी- २६८ (५४१), पांजरे-१६९ (३४७), वाकी-१३९ (३१२), निळवंडे-१२६ (१५५),आढळा-३७ (५७),अकोले-१४० (२१०),कोतूळ-६८ (१३०) तसेच सोमवारी संध्याकाळी भंडारदरा धरणात- १ हजार ७७६, निळवंडे धरणात-५०८, तर आढळा धरणात १४१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. तालुक्यात सोमवारी सर्वदूर रिमझिम सरी पडल्या. आंबीत, बलठण या लघूपाटबंधारे तलावांपाठोपाठ ६०० दशलक्ष घनफूट क्षमतेचा पिंपळगाव खांड लघू पाटबंधारे प्रकल्प व शिरपुंजे, कोथळे, वाकी हे तलाव ओसंडून वाहिले. गणोरे परिसरात जोरदार सरी गणोरे : आढळा परिसरात तब्बल एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर रविवारी जोरदार पावसाची हजेरी लागली. खरीप पिकांच्या पेरणीसाठी आता उशीर झाल्याने शेतकरी युद्धपातळीवर तयार आहेत. सोमवारी दिवसभर पाऊस उघडला होता. आता मशागतीसाठी जमीन वाफसा होण्याची प्रतीक्षा आहे. आढळा धरणाच्या परिसरातील गेल्या महिन्याभरात फक्त वीस मिलिमीटर तर काल एकाच दिवसात ३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला एकूण ६५ मिलिमीटर पाऊस झाला होता. आढळा धरणातील पाणीसाठा १४१ दशलक्ष घनफूट असून अद्याप नवीन पाण्याची आवक झालेली नाही. तसेच नवीन चारा येण्यासही वेळ लागेल. (प्रतिनिधी)बोटा : अकोले तालुक्यातील सर्वदूर पावसामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. पठार भागातील नदीलगतच्या घारगाव व साकूर, तसेच इतर गावांना यामुळे चांगलाच दिलासा मिळाला आहे. अकोले तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने या भागातून उगम पावणारी मुळा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना त्याचा चांगलाच फायदा होणार आहे. या भागात होत असलेल्या समाधानकारक पावसाने धूळ वाफेवरील खरिप हंगामातील पेरण्यांना जीवदान मिळाले आहे. यामुळे मुळा धरणात नवीन पाण्याची आवक होत आहे. मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात मात्र समाधानकारक पाऊस झालेला नाही.मुळा धरण पाणलोटात पाऊस सुरू असल्याने सोमवारी दुपारी ७३०० क्सुसेक वेगाने धरणात पाण्याची आवक सुरू झाली. त्यानंतर सायंकाळी आवक १००० क्युसेकने घटून ६२०० वर आली. सध्या मुळा धरणात ५५३५ दशलक्ष घनफूट पाणी आहे. कोपरगाव : कोपरगाव तालुक्यात गेल्या २४ तासात १ इंच पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. शहरात आत्तापर्यंत ६९ मिली मीटर पाऊस झाला आहे. दारणा धरणात पाण्याची चांगली आवक झाली आहे. महालखेडा(४० मिलीमीटर), पढेगाव (३०), नांदूर मधमेश्वर (२१), ब्राम्हणगाव (३६).