शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नगर शहरातील कापड बाजारातील ‘हा’ भाग उद्यापासून उघडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 20:30 IST

अहमदनगर: लॉकडाऊनमुळे दोन महिन्यांपासून बंद असलेली नगर शहरातील कापडबाजार, घासगल्ली आणि नवीपेठ उद्या सकाळी ९ वाजेपासून सुरू करण्यास महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी परनगी दिली आहे़ तसा आदेश मंगळवारी रात्री उशिराने काढण्यात आला़ 

 अहमदनगर: लॉकडाऊनमुळे दोन महिन्यांपासून बंद असलेली नगर शहरातील कापडबाजार, घासगल्ली आणि नवीपेठ उद्या सकाळी ९ वाजेपासून सुरू करण्यास महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी परनगी दिली आहे़ तसा आदेश मंगळवारी रात्री उशिराने काढण्यात आला़ पहिल्या दिवशी बुधवारी कापडबाजार, घासगल्ली आणि नवीपेठ भागातील सर्व दुकाने सुरू करण्यास महापालिकेने हिरवा कंदी दाखविला आहे़ दुसºया दिवशी गुरुवारी चितळे रोड, लक्ष्मीकारंजा आणि बँक रोडवरील दुकाने सुरू करता येणार आहेत़ त्यानंतर तिसºया दिवशी शुक्रवारी सारडगा गल्ली, मोची गल्ली आणि गंजबाजार सुरू करण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे़ शहरातील बाजारपेठा तीन टप्प्यात सुरू करण्यात येणार आहेत़ मात्र दुकानांमध्ये गर्दी होणार नाही़ ग्राहक व व्यापारी मास्क वापरतील, याची खबरदारी घ्यावी़ दुकानांमध्ये प्रमाणपेक्षा जास्त गर्दी झाल्याचे आढळून आल्यास दुकाने तात्काळ बंद करून सील करण्यात येतील, असे आयुक्त मायकलवार यांनी स्पष्ट केले आहे़ आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखालील व्यापाºयांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त मायकलवार यांच्याशी  दुपारी चर्चा केली होती़ कापडबाजारातील दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी यावेळी व्यापाºयांनी केली़ दुकाने बंद असल्याने मोठे अर्थिक नुकसान होत असून, या दुकानांवर अवलंबून असलेल्या अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे़ नियम ठरवून पालिकेने दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी़ व्यापारी नियम पाळून दुकाने सुरू करतील़ तसेच  प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाºया सूचनांचे पालन करतील, असे यावेळी जगताप यांनी सांगितले़ व्यापाºयांसोबत झालेल्या बैठकीनंतर आयुक्त मायकलवार यांनी प्रभारी शहर अभियंते सुरेश इथापे यांच्यासह प्रमुख अधिकाºयांची बैठक घेऊन दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला़ त्याचा आराखडा तयार करण्यात आला असून, तीन टप्प्यांत दुकाने सुरू केली जाणार आहेत़ परंतु, दुकानांमध्ये गर्दी झाल्यास दुकाने तातडीने बंद करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले़़़़़असे आहेत टप्पे बुधवार- एम़जी रोड, घासगल्ली, नवीपेठगुरुवार चितळेरोड, लक्ष्मीकारंजा, बँक रोडशुक्रवार- सारडा गल्ली, मोची गल्ली, गंजबाजार