शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरच्या के. के. रेंजवर युद्ध सरावाचा थरार

By साहेबराव नरसाळे | Updated: January 28, 2023 12:57 IST

के. के. रेंज या लष्कराच्या युद्ध सराव भूमीवर शनिवारी (दि. २८) नेपाळ व निमंत्रित मित्र राष्ट्राच्या सैन्यांसमोर भारतीय लष्कराने एक तास युद्ध सरावाची प्रात्यक्षिके दाखविली. 

अहमदनगर : लष्काराचे टेहळणी हेलीकॉप्टर, धुरांचे लोट उसळत शत्रूवर चाल करुन जाणारे अत्याधुनिक रणगाडे, कानठळ्या बसवणाऱ्या तोफांचा मारा, क्षेपणास्त्रांचा मारा, गोळीबार  असा युद्ध भूमीवरचा थरार अहमदनगरजवळील के. के. रेंजवर रंगला. निमित्त होते लष्कराच्या युद्ध सराव प्रात्यक्षिकांचे!

के. के. रेंज या लष्कराच्या युद्ध सराव भूमीवर शनिवारी (दि. २८) नेपाळ व निमंत्रित मित्र राष्ट्राच्या सैन्यांसमोर भारतीय लष्कराने एक तास युद्ध सरावाची प्रात्यक्षिके दाखविली. भारतीय सैन्याच्या प्रमुख प्रशिक्षण संस्था असलेल्या आर्मड कॉर्प्स सेंटर व स्कूल, मॅकेनाइज्ड इन्फंट्री सेंटर यांच्या वतीने मेजर जनरल अनिलराज सिंग काहलो यांच्या मार्गदर्शनाखाली हे युद्ध सराव प्रात्यक्षिक घेण्यात आले. या युद्ध सरावात ड्रोनच्या मदतीने शत्रूवर पाळत ठेवून शत्रूला एका सेकंदात निष्प्रभ करण्यच्या लष्कराच्या क्षमतेचे प्रदर्शन दाखविण्यात आले.

रणगाड्यांवरून तोफांचा मारा, बॉम्ब वर्षाव करण्यात आला. रणगाड्यांमधून आगीचे लोळ सोडत काही क्षणात शत्रूला भस्मसात करणाऱ्या तोफांचा मारा करण्यात आला. अर्जुन, भीष्म, अजय, टी-९०, टी-७२, बीएमपी-२ या अत्याधुनिक तंत्रप्रणाली असणाऱ्या रणगाड्यांमधून अचूक मारा करीत शत्रूचा नाश कसा करता येऊ शकतो हे दाखविण्यात आले. अर्जुन, भीष्म, अजय, टी-९०, टी-७२, अजय, एमबीटी अर्जुन, बीएमपी-२ या अत्याधुनिक रणगाड्यांद्वारे शत्रूचा अचूक निशाणा साधण्यात भारतीय सैन्याला यश आले. या रणगाड्यांमध्ये धूर निर्माण करण्याची अतिउच्च क्षमता आहे. त्यामुळे धोक्याच्या परिस्थितीत शत्रूला हुलकावणी देऊन पुन्हा तीव्र हल्ला चढविण्याचे सामर्थ्य या रणगाड्यांमध्ये आहे. या रणगाड्यांमध्ये गन, अणु युद्धात शत्रूचा मारा निष्प्रभ करण्याची क्षमता आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या प्रात्यक्षिकांनंतर उपस्थितांना जवळून रणगाडे, अत्याधुनिक शस्त्रास्त्रे दाखविण्यात आले.

टॅग्स :warयुद्धAhmednagarअहमदनगर