शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
4
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
5
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
6
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
7
Viral News: कानपूरहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात उंदीर; उड्डाणाला साडेतीन तास विलंब!
8
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
9
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
10
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
11
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
13
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
14
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
15
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
16
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
17
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
18
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
19
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
20
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!

अहमदनगर जिल्हा परिषद पदभरतीत पहिल्या संवर्गाचा निकाल जाहीर, वरिष्ठ सहायकच्या ७ जागा भरणार

By चंद्रकांत शेळके | Updated: January 19, 2024 23:32 IST

Ahmednagar: अहमदनगर जिल्हा परिषदेच्या क वर्गातील पदभरती प्रक्रियेत तीन महिन्यांनंतर एका संवर्गाचा निकाल जाहीर झाला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने वरिष्ठ सहायक (लेखा) या पदाच्या परीक्षेच्या निकालाची गुणवत्ता यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.

- चंद्रकांत शेळके अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या क वर्गातील पदभरती प्रक्रियेत तीन महिन्यांनंतर एका संवर्गाचा निकाल जाहीर झाला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने वरिष्ठ सहायक (लेखा) या पदाच्या परीक्षेच्या निकालाची गुणवत्ता यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. दरम्यान, परीक्षा झालेल्या इतर संवर्गाचे निकाल अद्याप लागले नाहीत, तर आरोग्यसेवकसह अन्य संवर्गाची परीक्षा होणेही बाकी आहे.राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील क वर्ग प्रवर्गातील पदभरतीची जाहिरात ॲागस्टमध्ये प्रसिद्ध झाली. यात नगर जिल्हा परिषदेत विविध संवर्गाच्या ९३७ पदांसाठी ४४ हजार ७२६ अर्ज दाखल झाले. नियोजनाअभावी अनेकदा परीक्षा पुढे ढकलल्यानंतर ७ ॲाक्टोबर २०२३ रोजी वरिष्ठ सहायक (लेखा) या पदासाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. पुढील तीन महिन्यांत टप्प्याटप्प्याने विविध संवर्गाच्या परीक्षा झाल्या. दरम्यान, सव्वातीन महिन्यांनंतर प्रथम झालेल्या वरिष्ठ सहायक संवर्गाचा निकाल जाहीर झाला आहे. या संवर्गातील ७ पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी ६२८ उमेदवारांनी परीक्षा दिली होती. ‘आयबीपीएस’ कंपनीने परीक्षा घेऊन निकाल जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा निवड समितीकडे सुपूर्त केला. त्यानुसार हा निकाल जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. परीक्षा झालेल्या उर्वरित पदांच्या निकालाकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, निकाल जाहीर झाल्यावर आता निवड समितीच्या मान्यतेने कागदपत्रांची पडताळणी करण्यात येऊन त्यानंतर नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. उमेदवारांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे. पाच संवर्गांची परीक्षा अद्याप बाकी९२७ पदांसाठी गेल्या तीन महिन्यांपासून परीक्षा सुरू आहेत. अखेरची औषध निर्माण अधिकारी पदाची परीक्षा २६ डिसेंबर २०२३ रोजी झाली. आरोग्य सेवक पुरुष (४० टक्के), आरोग्य सेवक पुरुष (५० टक्के), आरोग्य परिचारिका, कंत्राटी ग्रामसेवक व अंगणवाडी मुख्य सेविका या पाच संवर्गांची परीक्षा होणे अद्याप बाकी आहे. ३५ जणांचीच होणार कागदपत्र पडताळणीवरिष्ठ सहायक (लेखा) या संवर्गातील ७ पदांसाठीची परीक्षा एकूण ६२८ उमेदवारांनी दिली. २०० गुणांची ही परीक्षा होती. यात ९० पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या ३७७ जणांची गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यातून ३५ जणांनाच कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाणार आहे. यात १७८ गुण मिळवणारा उमेदवार यादीत प्रथम क्रमांकावर आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर