शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Ahmednagar: पुणतांबा ग्रामपंचायतच्या निवृत्तांचे पाचव्या दिवशी सोडले उपोषण 

By सुदाम देशमुख | Updated: May 5, 2023 14:18 IST

Ahmednagar: पुणतांबा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरु असलेले  निवृत्त कर्मचाऱ्यांनी उपोषण पाचव्या दिवशी मागे घेतले. गावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, उपोषणकर्ते यांच्यात काही मुद्द्यावर एकमत झाले.

अहमदनगर  - पुणतांबा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरु असलेले  निवृत्त कर्मचाऱ्यांनी उपोषण पाचव्या दिवशी मागे घेतले. गावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, उपोषणकर्ते यांच्यात काही मुद्द्यावर एकमत झाले.

पुणतांबा ग्रुप ग्रामपंचायतचे निवृत्त कर्मचारी प्रभाकर शेंडगे, भरत शेरकर, लक्ष्मण वडने, भोलानाथ थोरात यांनी कामगार दिनाच्या दिवशी थकीत ग्रॅज्युइटी (उपदान)रकम मिळावी यासाठी मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषणास बसले होते. या कर्मचाऱ्यांनी उपोषणाचा मार्ग सोडावा यासाठी ग्रामविस्तार अधिकारी सुनील माळी यांची दोन वेळेस केलेली शिष्टई अयशस्वी झाली.

गटविकास अधिकरी जालिंदर पठाडे यांनी तिसऱ्या दिवशी उपोषण स्थळी भेट देत कायद्याच्या निकष नुसार रक्कम मिळेल, तसेच ग्रामपंचायत वसुली झाल्याशिवाय रक्कम देता येणार नाही. ती रक्कम ६५ % राहील असे सांगितल्याने त्यादिवशी तोडगा निघाला नाही. आज ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकरी प्रमोद कानडे, सरपंच डॉ. धनंजय धनवटे उपसरपंच संदीप धनवटे, सदस्य कामगार नेते सुभाष कुलकर्णी, भाजप जिल्हा सरचिटणीस सुभाष वहाडणे, सदाशिव वहाटोळे, राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक आयोग सचिव छगन जोगदंड यांच्या समवेत उपोषणकर्त्या बरोबर थकीत रक्कमेत  ६५% रक्कम  ग्रामपंचायत देईल. न्याय प्रविष्ट बाबी कर्मचाऱ्यांनी मागे घ्याव्यात अशी चर्चा झाली. ती उपोषणकर्ते यांनी मान्य केली. सरपंच डॉ.धनंजय धनवटे, ग्रामविकास अधिकारी प्रमोद कानडे यांच्या हस्ते फळांचा रस घेऊन उपोषण सोडण्यात आले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरgram panchayatग्राम पंचायत