शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

रेड लाईट एरियात जागली माणुसकी, केरळसाठी वेश्यांनी जमवला निधी   

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 20:52 IST

केरळमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी तळागाळातील वर्गही पुढे येत आहे. नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत, क्रिकेटर्संपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण केरळच्या मदतीसाठी सरसावले आहेत. मुंबईच्या डेबवाल्यांनी मदत

अहमदनगर - केरळमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी तळागाळातील वर्गही पुढे येत आहे. नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत, क्रिकेटर्संपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण केरळच्या मदतीसाठी सरसावले आहेत. मुंबईच्या डेबवाल्यांनी मदत दिली, कुठे लग्नाचा खर्च टाळून मदत दिली, कुठे व्हॉट्सअॅप ग्रुपने एकत्र येऊन मदत दिली, हे आपण ऐकले आहे. मात्र, आता केरळच्या मदतीसाठी वेश्यांनीही पुढाकार घेतला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील वेश्यांनी केरळच्या मदतीसाठी 21 हजारांची मदत दिली आहे. 

समाजाकडून नेहमीच तुच्छ नजरेने पाहिल्या जाणाऱ्या वेश्यांनी आपल्या कामातून स्वत:ची इमेज वाढवली आहे. नेहमीच शिवी देऊन ज्यांना झिडकारले जाते, त्यांनी आज कौतुकास्पद कामगिरी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील वेश्यांनी पंतप्रधान मदतनिधी केंद्राकडे 21 हजारांची मदत पाठविली असल्याचे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. विशेष म्हणजे महिनाअखेरपर्यंत 1 लाख रुपये जमा करण्याचे त्यांचे उद्धिष्ट आहे. या महिलांच्या समुहाने सोमवारी उप-जिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांच्याकडे 21 हजार रुपयांचा चेक जमा केला. शहरातील एनजीओ 'स्नेहालय'चे अधिकारी दीपक बुराम यांनी सांगितले की, देहविक्रीच्या व्यवसायाशी संबंधित महिलांनी महिनाअखेपर्यंत 1 लाख रुपये जमा करण्याचे ठरवले आहे. ते एक लाख रुपये केरळमधील पूरग्रस्तांसाठी मदतनिधी म्हणून देण्यात येणार आहेत. यापूर्वीही या महिलांनी आपत्तीच्या काळात मदतनिधी उभारला आहे. डिसेंबर 2015 मध्ये चेन्नईत महापूर आला होता. त्यावेळी या महिलांनी 1 लाख रुपये चेन्नईच्या पूरग्रस्तांना मदतनिधी म्हणून दिले होते, असे बुराम यांनी सांगितले.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरsex crimeसेक्स गुन्हाsnehalayस्नेहालय